Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

६ मार्च विशेष योग: पर्समध्ये ठेवा 'हे' पान; पैशाला पैसा जोडला जाईल आणि हॉस्पिटलच्या फेऱ्या थांबतील!

६ मार्च विशेष योग: पर्समध्ये ठेवा 'हे' पान; पैशाला पैसा जोडला जाईल आणि हॉस्पिटलच्या फेऱ्या थांबतील!



घरात येणारा पैसा टिकत नाहीये? कमावलेला बराचसा हिस्सा हॉस्पिटलच्या बिलांमध्ये खर्च होतोय? अशा वेळी आपल्या परंपरेत आणि ज्योतिषशास्त्रात काही साधे पण अत्यंत प्रभावी उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे पैसा टिकतोही आणि वाढतोही! ज्योतिष अभ्यासक यशदा क्षीरसागर यांनी असाच एक उपाय ६ मार्च रोजी करा असे सुचवले आहे. त्याबद्दल जाणून घेऊ.

अनेकांना कष्ट करूनही योग्य मोबदला मिळत नाही किंवा पैसा येतो पण तो अनावश्यक कारणांसाठी खर्च होतो. अशा वेळी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी 'तमाल पत्र' आणि 'एंजल नंबर्स' यांचा वापर करणे फायदेशीर ठरते.

आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यात दडलेले 'तमाल पत्र'  केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर ते तुमच्या आयुष्यातील आर्थिक चणचणही दूर करू शकते. या शुक्रवारी, म्हणजेच ६ मार्च २०२६ रोजी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा हा एक सोपा घरगुती उपाय-कसा करायचा हा उपाय?

१. साहित्य: एक सुके आणि स्वच्छ तमाल पत्र (कुठूनही फाटलेले नसावे) आणि एक लाल रंगाचा पेन (लाल शाई).
२. क्रमांक लिहा: त्या तमाल पत्रावर सर्वात वर ५२० हा आकडा लिहा आणि त्याच्या अगदी खाली ७४१ हा आकडा लिहा.
३. साठवणूक: हे तमाल पत्र तुमच्या कपाटातील लॉकरमध्ये, तुमच्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये ठेवा.
४. श्रद्धा: हा उपाय करताना मनात सकारात्मक विचार ठेवा की, "माझ्याकडे पैसा आकर्षित होत आहे आणि तो सत्कारणी लागत आहे."
या क्रमांकांचे रहस्य काय?

५२०: हा अंक विश्वातून अनपेक्षित धनलाभ आणि संधी आकर्षित करण्यासाठी ओळखला जातो.

७४१: हा अंक त्वरित समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि यशाचे मार्ग मोकळे करण्यासाठी प्रभावी मानला जातो.

६ मार्च २०२६ चे महत्त्व का आहे?

ज्यांना हा उपाय 'फाल्गुन पौर्णिमेला' करणे शक्य झाले नाही, त्यांच्यासाठी शुक्रवार, ६ मार्च २०२६ हा दिवस सुवर्णसंधी आहे. त्यामागील ज्योतिषशास्त्रीय कारणे खालीलप्रमाणे आहेत:

शुक्रवार आणि लक्ष्मी: शुक्रवार हा देवी महालक्ष्मीचा दिवस मानला जातो, जो धन आणि वैभवाचा कारक आहे. 

क्रमांक ६: ६ हा अंक ज्योतिषशास्त्रात 'शुक्र' ग्रहाचा प्रतिनिधी आहे. शुक्राचे स्थान: या दिवशी शुक्र मीन राशीत (उच्च राशीत) विराजमान आहे. मीन राशीतील शुक्र अत्यंत प्रबळ आणि शुभ फळ देणारा असतो. त्यामुळे या दिवशी केलेला उपाय तुमच्या आर्थिक स्थितीला मजबुती देऊ शकतो.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.