शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! 15 जूनपासून सुरु होणाऱ्या शालेय सत्रात बदल, उन्हाळी सुट्ट्यांची तारीखही जाहीर
येत्या एप्रिलपासून हे शैक्षणिक वर्ष संपत असून जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. यामुळे आता शालेय विभागाने या बदलत्या शैक्षणिक वर्षात नवे बदल केले आहेत. राज्य सरकारच्या शालेय विभागाकडून यंदाच्या उन्हाळी सुट्टीबाबत माहिती देण्यात आली. याबाबतचे परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्ध केले असून उन्हाळी सुट्टी दोन मे पासून सुरू होणार होईल असे सांगितले आहे.
तर उन्हाळी सुट्टी 14 जूनपर्यंत राहणार असून 15 जूनपासून शैक्षणिक वर्षास सुरुवात होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. तसेच नव्या शैक्षणिक वर्षात मोठे बदल करण्यात आले असून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताच सकाळच्या सत्रात शाळा भरणार आहेत. हा बदल 29 जूनपर्यंत असणार असून 30 जूनपासून नियमित सत्रात शाळा सुरू होतील असा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षण संचालनालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व सुसंगती आणण्यासाठी नवीन बदल केले आहेत. याप्रमाणे राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२६ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२६-२७ वर्षात हे बद करण्यात आले आहेत.
राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शनिवार दि.०२ मे, २०२६ पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा. पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ मध्य विदर्भ तसेच इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि. १५ जून, २०२६ रोजी सुरू करण्यात याव्यात.
जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि. १५ जून २९ जून पर्यत सकाळ सत्रात ७.०० ते ११.४५ या वेळेत सुरू करण्यात याव्यात. मंगळवार दि. ३० जूनपासून नियमित वेळेत शाळा सुरू करण्यात याव्यात. वरील सूचना आपल्या अधिनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.
1. उन्हाळी सुट्टी कधीपासून आहे?2 मेपासून 14 जूनपर्यंत सुट्टी राहणार आहे.2. शाळा कधी सुरू होणार आहेत?15 जूनपासून शाळा सुरू होतील.3. सकाळच्या सत्राचा बदल किती दिवस असेल?15 जून ते 29 जूनपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा भरतील.4. नियमित वेळापत्रक कधी सुरू होईल?30 जूनपासून नियमित वेळापत्रक लागू होईल.5. हा निर्णय कोणी जाहीर केला?प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे हा निर्णय जाहीर केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.