Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक 2.7 किलो गांजा जप्त : सांगली शहर पोलिसांची कारवाई

सांगलीत गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक 2.7 किलो गांजा जप्त : सांगली शहर पोलिसांची कारवाई



शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणीच्या पाठीमागे असलेल्या एका हॉटेलजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 2.7 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली. 
सोहेल गफुर तांबोळी (वय २६, रा. गल्ली नंबर १, हनुमान नगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला अंमली पदार्थांची विक्री, साठा, तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक शहरात गस्त घालत होते. पथकातील संतोष गळवे, गौतम कांबळे यांना एक तरुण गांजा विक्री करण्यासाठी आकाशवाणीच्या मागील हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.
पथकाने तेथे सापळा रचून तांबोळी याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ 2.7 किलो गांजा सापडला. तो जप्त करून त्याला अटक करण्यात आली. सांगली शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, शहरचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश घोरपडे, संदीप पाटील, सतीश लिंबळे, विनायक शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, योगेश हाक्के, गणेश कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.