तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश
आसाममधील कार्बी आंगलोंग भागात प्रशिक्षणादरम्यान रडारवरून गायब झालेले भारतीय हवाई दलाचे सुखोई एसयू-30 एमकेआय लढाऊ विमान कोसळले. या अपघातात दोन्ही वैमानिक, स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद झाले.
पूर्वेश दुरगकर भंडारा जिल्ह्याचे सुपूत्र आहेत. आज (6 मार्च) पहाटे एकच्या सुमारास हवाई दलाने या अपघाताची पुष्टी केली. आज सकाळी सव्वा नऊ वाजता दुसऱ्या एक्स-पोस्टने दोन्ही वैमानिकांच्या मृत्यूची माहिती दिली. लष्कराच्या म्हणण्यानुसार, शोध मोहीम सुरू आहे. लढाऊ विमान नियमित उड्डाण किंवा मोहिमेवर असताना त्याचा जमिनीवरील नियंत्रणाशी संपर्क तुटला.
हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, रडारशी संपर्क तुटल्यानंतर, हवाई दलाने ताबडतोब अलर्ट जारी केला आणि घटनेची चौकशी करण्यासाठी आयएएफ टीम आसामला पाठवली. विमानाचे नेमके स्थान आणि संपर्क तुटण्याचे कारण सध्या निश्चित केले जात आहे.
सुखोई हे बहुउद्देशीय लढाऊ विमान
सुखोई एसयू-३०एमकेआय हे भारतीय हवाई दलाच्या सर्वात प्रगत आणि शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. हे एक दोन इंजिन असलेले बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे जे हवाई संरक्षण, लांब पल्ल्याच्या हल्ल्यासाठी आणि देखरेखीसाठी वापरण्यात येते. गेल्या 12 वर्षात आठव्यांदा सुखोई फायटर जेट कोसळलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.