नाशिकमधील कथित अंकशास्त्रज्ञ आणि भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत धक्कादायक गौप्यस्फोट केला. "राज्यातील ३८ आमदारांनी अघोरी कृत्यांसाठी खरातकडे जाऊन आपल्या करंगळ्या कापल्या असून, त्याची यादी आहे," असा खळबळजनक दावा आव्हाड यांनी केला. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ते आमदार कोण असतील अशी जोरदार चर्चा सुुर आहे.
अघोरी कृत्यांचा पर्दाफाश
संतांच्या महाराष्ट्रात अशा काळ्या जादूला राजमान्यता मिळणे दुर्दैवी आहे. खरातने स्वतःच्या दैवी शक्तीचा आभास निर्माण करण्यासाठी रिमोटवर चालणारे नकली साप आणि वाघाच्या कातड्याचा वापर केला. इतकेच नाही, तर चिंचुके पॉलिश करून ते अंगठीत बसवून लोकांकडून लाखो रुपये उकळले. अनेक मोठे मंत्री आणि अधिकारी त्याच्यासमोर लोटांगण घालत होते, असा आरोपही केला.दरम्यान, खरात प्रकरणाचा जोरदार तपास सुरु आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना पहिला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर इतरही अनेक आमदार मंत्रि यांचे खरात सोबत फोटो आहेत. त्यामुळे 38 आमदारांनी नावे समोर येण्याची शक्यता आहेे. ती नावे समोर आल्यास त्यावर काय कारवाई होईल हे पहावे लागेल. जादू टोणा कायद्याअंतर्गत सर्व आमदार यांच्यावर कारवाई झाल्यास ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना होईल.
अंधश्रद्धा निर्मूलनावर अनेक वर्षांपासून लढा -
अंधश्रद्धा निर्मूलन समिती नरेंद्र दाभोळकर यांच्या नेतृत्वात अनेक वर्ष सक्रिय होती. त्यांच्यानंतरही ती सक्रिय असून आतापर्यंत शेकडो ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केलेले आहे. महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा विरोधी कायदा केला मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी प्रभावीपणे केली नाही. त्याचाच हा फटका असल्याचे दिसते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला प्रोत्साहन देऊन सरकारनेही त्यात सहभागी होऊन संपूर्ण राज्यात छापे टाकून अंधश्रद्धा निर्मूलनास पुढाकार घेतला पाहीजे अशी मागणी होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.