हजारो किलोमीटरहून 4 देशांकडून गॅस भरलेले टँकर भारताकडे रवाना, उत्पादनात तातडीने 10% वाढ; इंधन टंचाईत सरकारचा 'प्लान B' लागू!
पश्चिम आशियातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि इराण मागे हटायला तयार नाही. मिडल-ईस्टमधील ताणामुळे जागतिक तेल आणि वायूचा तुटवडा निर्माण झाला असून याचा परिणाम भारतात, विशेषतः एलपीजी संकटावर स्पष्टपणे दिसून येत आहे. देशभरातील वेगवेगळ्या शहरांमधय एलपीजी सिलिंडरचा तुटवडा पाहायला मिळत आहे.
4 देशांकडून गॅस भरलेली जहाजे भारताच्या दिशेने रवाना
अशा परिस्थितीत सरकारने तातडीने कृती करून महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. देशांतर्गत एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर मोदी सरकारचा प्लॅन बी देखील ॲक्शनमध्ये दिसत आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासारख्या देशांमधून एलएनजी आणि एलपीजीची अतिरिक्त शिपमेंट भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत.मोदी सरकारने एलपीजी संकटावर मात करण्यासाठी 'प्लॅन बी' अंतर्गत देशांतर्गत उत्पादन 10% वाढवण्यासोबतच इतर देशांमधून एलएनजी आणि एलपीजीचा अतिरिक्त साठा आणायला सुरु केला आहे. अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नॉर्वे आणि इतर देशांमधून अतिरिक्त एलएनजी-एलपीजी भरलेली जहाजे भारतात पोहचू लागली आहेत. आखाती देशातील तणावाच्या परिस्थितीमुळे मध्यपूर्वेत ऊर्जा प्रवाहात व्यत्यय येत असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या शिपमेंटबद्दल चिंता निर्माण होत असल्याने भारताची तेल पुरवठा साखळी विस्कळी झालीय आणि सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होताना दिसत आहेत.
अनिश्चिततेच्या काळात LPG उत्पादनात वाढ
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक बाजारात तेलाबाबत मोठा पेच निर्माण झाला असून या युद्धाची धग आता सर्वसामान्यांनाही जाणवू लागली आहे. ऊर्जा पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे एलपीजी आणि तेल संकट अधिकच वाढले आणि भारतातील एलपीजी संकटाच्या काळात सरकारने व्यावसायिक एलपीजी वापरावरील निर्बंध कडक करून घरगुती गॅसचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करायच्या दिशेने पावले उचलली आहेत.
उच्च सरकारी अधिकाऱ्यांचा हवाला देऊन बिझनेस टुडेने म्हटले आहे की व्यावसायिक एलपीजीच्या कमतरतेबद्दल वाढत्या चिंता आणि निषेधाच्या पार्श्वभूमीवर आयओसीएल, बीपीसीएल आणि एचपीसीएल सारख्या भारतीय रिफायनरीजनी घरगुती एलपीजी उत्पादनात 10% वाढ केली आहे.
भारताला एलपीजी कुठून मिळतो?
कतारमधून भारताला सर्वाधिक 42.22% एलएनजीचा पुरवठा होतो. त्यानंतर, अमेरिका (18.5%), युएई (11.11%), अंगोला (7.07%) आणि नायजेरिया (5.18%) आहे, ज्यापैकी अंदाजे 15% इतर स्रोतांकडून येतात. त्याचवेळी, एलपीजी मिश्रण भारत विशेषतः आखाती देशांवर अवलंबून असून युएई आणि कतार एकत्रितपणे 62% पेक्षा जास्त आयात पुरवतात, त्यानंतर सौदी अरेबिया (18.2%) आणि कुवेत (15.6%) आहेत. अमेरिका अलीकडेच एक धोरणात्मक भागीदार म्हणून उदयास आला आहे, जो 2206 च्या पुरवठ्यापैकी अंदाजे 10% पुरवठा करतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
