Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- गरिबांच्या झोपड्यांवर बुलडोजर… श्रीमंतांच्या बेकायदेशीर इमारतींवर मौन का? – आयुक्तांना जाब विचारणार!

सांगली :- गरिबांच्या झोपड्यांवर बुलडोजर… श्रीमंतांच्या बेकायदेशीर इमारतींवर मौन का? – आयुक्तांना जाब विचारणार!



सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात अतिक्रमणाविरोधात कारवाई करताना दुर्दैवाने दुहेरी निकष वापरले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. महापालिकेचे आयुक्त गरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या झोपड्या, खोकी व छोट्या अतिक्रमणांवर बुलडोजर चालवतात, परंतु शहरातील धनदांडगे आणि प्रभावशाली लोकांच्या बेकायदेशीर इमारतींवर मात्र कारवाई होताना दिसत नाही.

महापालिका प्रशासन कारवाईची रील्स आणि व्हिडिओ काढून प्रसिद्धी मिळवत आहे, पण खरोखरच न्याय्य व पारदर्शक कारवाई करायची असेल तर श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांचीही बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचे धाडस दाखवावे.
आमच्याकडे असेही पुरावे आहेत की महापालिकेच्या नगररचना विभागाकडून काही इमारतींना नियमबाह्य पद्धतीने परवानग्या देण्यात आल्या आहेत.

आम्ही हे सर्व पुरावे दिनांक १३ मार्च रोजी महापालिकेसमोर निदर्शने करत प्रशासनासमोर ठेवणार आहोत.

आयुक्तांना आम्ही थेट प्रश्न विचारणार आहोत:
गरीबांवरच कारवाई का?

श्रीमंतांच्या बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करण्याचे धाडस आहे का?

नियमबाह्य परवाने देणाऱ्या आपल्या स्वतःच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का?

चला जाब विचारूया!
गरिबांना एक न्याय आणि श्रीमंतांना दुसरा न्याय चालणार नाही.
सांगली-मिरज-कुपवाड शहरात कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे.
जर प्रशासनाने लवकरच याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही तर ना
गरिकांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात येत आहे.
सांगलीतील अतिक्रमण ग्रस्त नागरिकांनी मोठया संख्येने महानगरपालिके समोर आंदोलनात सहभागी व्हावे 
आपला
 तानाजी सावंत
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 
जिल्हा अध्यक्ष सांगली

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.