जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय कार्यक्रम 'कौन बनेगा करोडपती तील सहभागी झालेल्या महिला तहसीलदार अडचणीत सापडल्या आहेत. अडीच कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात त्यांना मध्य प्रदेशातील ग्वालियरमधून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेमुळे मध्य प्रदेशातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अमृता सिंह तोमर यांना 2021 मध्ये बडोदा तहसील विभागात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांनी रवानगी आता जेलमध्ये करण्यात आली आहे.
उलट-सुलट प्रतिक्रिया
अमृता सिंह तोमर या 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी त्याठिकाणी स्पर्धेक म्हणून 50 लाख रुपये जिंकले आहेत. आता त्यांना अटक झाल्याने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. तोमर यांना शिवपुरी येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे.
तत्कालीन तहसीलदार
सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्यानंतर त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक केली होती. मध्यप्रदेशमधील श्योपुर जिल्ह्यातील पुरग्रस्त व्यक्तींना देण्यात येणाऱ्या निधीमध्ये त्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप तोमर यांच्यावर आहे. तेव्हा त्या तत्कालीन तहसीलदार होत्या.
गुन्हा दाखल
कंत्राटदारांना हाताशी धरुन तोमर यांनी 127 बनावट बँक खाते उघडून पुरग्रस्तांना मिळालेली रक्कम सुमारे अडीच कोटी रुपये या खात्यात वळवली. हा प्रकार उपजिल्हाधिकारी यांनी केलेल्या ऑडिटमध्ये उघड झाली. त्यानंतर बडोदा पोलिस ठाण्यात तोमर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पदावरुन हटविण्यात आले
अटक करण्यात आल्यानंतर तोमर यांनी पहिल्यांदा ग्वालियर खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने रद्द केला. त्यानंतर तोमर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टानेपण त्यांची याचिका रद्द केली आहे. यानंतर त्यांना विजयपुर तहसीलदार पदावरुन हटविण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.