Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

औषधांच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारुची तस्करी : एकाला अटक कंटेनरसह 71.36 लाखांचा मुद्देमाल जप्त : म्हैशाळ फाट्यावर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

औषधांच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारुची तस्करी : एकाला अटक कंटेनरसह 71.36 लाखांचा मुद्देमाल जप्त : म्हैशाळ फाट्यावर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
 

औषधाच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा कंटेनर जप्त करून एकाला अटक करण्यात आली. कंटेनरसह 71.36 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या मिरज कार्यालयाने ही कारवाई केल्याची माहिती सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली. लभजित गुरमेज सिंह (वय 32, रा. पिलभित उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. राज्य गुप्त बातमीच्या आधारे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्कच्या मिरज कार्यालयाच्या पथकामार्फत आज रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 वरील म्हैशाळ फाट्याजवळ रोडवर सापळा रचून बनावट गोवा राज्य निर्मित महाराष्ट्र राज्यात विक्रीकरीता येणाऱ्या देशी दारुची अवैधरित्या वाहतुक करणारा दहा चाकी कंटेनर (MH.40 CT.2814) पकडला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत महाराष्ट्र राज्याचा महसुल चुकवुन आयात करीत असताना विविध प्रकारचे देशी दारु मिळून आले आहे.

त्यामध्ये कोंकण संत्रा 999, रॉकेट संत्रा, सिमला संत्रा, गोवा नं. 1 संत्रा देशी दारु या विविध प्रकारचे देशी दारु मद्यसाठा सापडला. त्याची एकूण किंमत 41.36 लाख इतकी आहे. तसेच सदर वाहनामध्ये बनावट नंबर प्लेट (MH.46 BM.5751 व WB.23 F.7876) मिळून आल्या असून विविध तीन प्रकारचे बनावट औषधांची बिले मिळून आले आहेत. त्यामध्ये मे. अरिस्टो फार्मासिटिकल्स प्रा. लि. भोपाल मध्यप्रदेश, मे. निकिता फार्मासिटिकल्स स्पेशालिटिज् प्रा. लि. नागपूर व मे. रुसन फार्मा लिमिटेड अंकलेश्वर गुजरात या कंपन्यांच्या नावची बनावट औषधांची बिले मिळून आली आहेत. 
 
यावेळी वाहनासह एकूण 71.36 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. कंटेनर चालकाकडे गुन्हयातील जप्त मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा मुद्देमाल गोवा राज्यातून आणला असून पुढे नागपूर या ठिकाणी घेऊन जाणार असल्याची माहिती सांगितली आहे. त्याच्याकडे अधिक तपास चालू आहे. सदर आरोपीवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई), 80, 81, 83 व 90 अन्वये गुन्हा नोंद करुन पुढील कायदेशीर तपास सुरु आहे.

राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेचे निरीक्षक दिपक सुपे, दुय्यम निरीक्षक लक्ष्मण पोवार, अजय लोंढे, जयसिंग खुटावळे, इरफान शेख, विनायक खांडेकर, स्वप्निल कांबळे, कविता सुपने, शाहीन शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.