डायबिटीजचा कायमचा नायनाट करण्यासाठी सालीसकट खा 'हे' एक फळं, १००० च्या स्पीडने कमी होईल रक्तातील साखर, १०० वर्ष जगाल
डॉक्टरांच्या मते, तुम्हाला मधुमेह असला तरीही सफरचंद खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नियमित सफरचंद खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी म्हणतात,
“सफरचंदांमध्ये पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात असतात, विशेषतः त्यांच्या बाह्य
थरात. त्यामुळे शरीराला चांगल्या प्रमाणात इन्सुलिन सोडण्यास मदत होते,
ज्यामुळे शरीराच्या पेशी साखर शोषण्यास मदत होते.” जर तुम्ही पोषक तत्त्वांनुसार तुमचा आहार वर्गीकृत करायला प्राधान्य देत
असाल, तर तुमच्या आहारात हिरवे सफरचंद समाविष्ट करा. लाल सफरचंदांची चव
थोडी गोड असली तरी हिरव्या सफरचंदांमध्ये साखर कमी आणि फायबर व
अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळीदेखील कमी
होते. ती पुढे म्हणते की, सफरचंदांचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे ३९ असतो,
जो कॉर्नफ्लेक्सपेक्षा कमी असतो.
सफरचंद रक्तातील साखर वाढू देत नाहीत
दरम्यान, पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमधील वरिष्ठ आहारतज्ज्ञ डॉ. स्वाती संधान यांच्या मते, एका मध्यम आकाराच्या सफरचंदात सुमारे २७ ग्रॅम कर्बोदके असून त्यापैकी सुमारे ४.८ ग्रॅम तंतुमय घटक (फायबर) असतात. या तंतुमय घटकांमुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढण्यास प्रतिबंध होतो. तसेच, सफरचंदातील बहुतांश साखर फ्रुक्टोज या स्वरूपात असते. त्यामुळे संपूर्ण फळ म्हणून सफरचंदाचे सेवन केल्यास रक्तातील साखरेवर मोठा किंवा अचानक परिणाम होत नाही.
सफरचंदाच्या सेवनाने इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते
सफरचंद
इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते. इन्सुलिन हे एक संप्रेरक आहे, जो
तुमच्या रक्तातून तुमच्या पेशींमध्ये साखर वाहून नेण्यात महत्त्वाची भूमिका
बजावतो. सफरचंदांमधील विशिष्ट फ्लेवोनॉइड्स, जसे की क्वेरसेटिन,
कार्बोहायड्रेट्सचे पचन कमी करून रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत
करतात. क्लोरोजेनिक आम्ल तुमच्या शरीराला साखर अधिक कार्यक्षमतेने शोषण्यास
मदत करू शकते; तर फ्लोरिझिन रक्तप्रवाहात साखरेचे शोषण कमी करू शकते.
अभ्यास काय म्हणतो?
२०१९ मध्ये ३,३९,३८३ सहभागींचा समावेश असलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, सफरचंद खाल्ल्याने टाईप-२ मधुमेहाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. त्याशिवाय मधुमेह असलेल्या लोकांनी त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी त्यांच्या दैनंदिन आहारात फळांचा समावेश करावा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.