Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking ! मुंबईच्या बड्या भाजपा आमदाराला 'पीएमओ'चा दणका! पंतप्रधान मोदींनीच दिले मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आदेश

Big Breaking ! मुंबईच्या बड्या भाजपा आमदाराला 'पीएमओ'चा दणका! पंतप्रधान मोदींनीच दिले मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आदेश



महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर, आमदारांवर इतकेच काय तर खासदारांवरही आरोप होताना दिसतात. मात्र या प्रकरणांमध्ये अनेकदा पुढे काही घडत नाही अशी तक्रार सर्वसामान्यांकडून आणि तक्रारदार एकमेकांचे राजकीय विरोधक असल्यावर होते.
मात्र महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून केंद्रीय नेतृत्वाकडून आर्थिक घोटाळ्यांसंदर्भातील कठोर भूमिका या प्रकरणामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. मात्र हा आमदार कोण आणि त्याच्यावर काय आरोप झालेत ते पाहूयात...

शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्याचा आरोप

ज्या आमदाराविरोधात थेट केंद्राकडून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत तो आमदार मुंबईलाच लागून असलेल्या मिरा-भाईंदरमधला आहे. मिरा-भाईंदरमधील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हे पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या आदेशामुळे अडचणीत आलेत. आगामी काळात मेहतांच्या अडचणीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मेहता यांच्यावर भूखंड लाटण्याचा आणि कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी लाटल्याचा आरोप होत आहे. मेहता यांनी सरकारची जवळपास 400 ते 500 कोटींहून अधिक स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप होत आहे. अनेक आदिवासी आणि इतर समाजाच्या लोकांच्या जमीन भाजपाच्या या आमदाराने हडपल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

महसूल मंत्र्यांकडूनच 'भूमाफिया' असा उल्लेख
याप्रकरणी पंतप्रधान मोदींकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. आता खुद्द पंतप्रधान कार्यालयाने या तक्रारींची दखल घेऊन थेट मुख्यमंत्री कार्यालयाला कारवाईचे आदेश मागील आठवड्यात दिले आहेत. एवढेच नाही तर काही महिन्यांपूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रावर नरेंद्र मेहता यांचा 'भूमाफिया' असा उल्लेख आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. त्यामुळेच आता आगामी काळात नरेंद्र मेहतांच्या अडचणी अधिक वाढण्याची दाट शक्यता असून त्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.
मेहतांचं म्हणणं काय?

महेता यांनी आपल्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, असं म्हटलं आहे. तसेच आपण कोणत्याही जमिनीचा गैरव्यवहार केलेला नाही, असंही मेहता यांनी म्हटलं आहे.

मेहतांवर कोणकोणते आरोप?
मेहता हे सेव्हन इलेव्हन कंपनीचे मालक आहेत. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी जमिनींचे अनेक गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. रिअल इस्टेट व्यवसायी जय शुक्ला यांनी मेहतांनी फ्लॅट विक्रीच्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी मेहतांवर गुन्हा दाखल आहे. मेहता यांनी मिरारोड येथील कांदळवन क्षेत्रात 'सेव्हन इलेव्हन क्लब' बांधला असून तो नियमांचं उल्लंघन करुन बांधल्याची याचिका 2019 मध्ये सामाजिक कार्यकर्ता धीरज परब यांनी केल्यानंतर मुंबई हायकोर्टाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.

मेहता यांनी सेव्हन इलेव्हन कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या जमिनी नोंदणीकृत न करता नाममात्र रकमेवर विकत घेतल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. कमी मुद्रांक शुल्क भरून मेहतांनी बांधकाम करुन शासनाचा महसूल बुडवण्याबरोबरच शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या शिवाय मेहतांवर अपना घर प्रोजेक्टमध्ये 79 कोटींचा वाळू रॉयल्टी घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मेट्रो उड्डाणपूल घोटाळ्यात 217 कोटींच्या प्रोजेक्ट 620 कोटींचा झाल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणात सध्या चौकशी सुरु आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.