अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडलेल्या एका भीषण घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वडगाव पान येथील शाळेत सहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अज्ञात तरुणाने अॅसिड हल्ला केल्याची घटना समोर आली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ही घटना शाळा सुटल्यानंतर घडली. संबंधित मुलगी नेहमीप्रमाणे घरी जात असताना अचानक एका अज्ञात युवकाने तिच्या समोर येत तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. अनपेक्षित हल्ल्यामुळे मुलगी गंभीर जखमी झाली आणि तिच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. तातडीने तिला उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.संगमनेर तालुक्यातील ही सलग दुसरी गंभीर घटना आहे. काही दिवसांपूर्वी रणखांब येथे लग्नास नकार दिल्यामुळे एका तरुणीवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यामुळे महिलांवर वाढत्या हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त होत आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांवर आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.