Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! ओडिशाच्या सरकारी रुग्णालयात भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा होरपळून मृत्यू

Big Breaking! ओडिशाच्या सरकारी रुग्णालयात भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा होरपळून मृत्यू



ओडिशाच्या कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये सोमवारी लागलेल्या आगीत किमान १० रुग्णांचा मृत्यू झाला. सरकारी रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर विभागात लागलेली आग आयसीयूच्या एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आग पहाटे २.३० ते ३ च्या दरम्यान लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, अधिकाऱ्यांनी सांगितले की ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. दरम्यान, मुख्यमंत्री मोहन चरण माझी घटनास्थळी पोहोचले आहेत.
अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यात यश मिळवले आहे. परंतु, आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या अनेक रुग्णांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एससीबी अधिकाऱ्यांनी अद्याप मृतांची नेमकी संख्या निश्चित केलेली नाही. इतर रुग्णांना तातडीने मेडिकल कॉलेजच्या इतर वॉर्डमधील आयसीयूमध्ये हलवण्यात आले, जरी अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.





➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.