Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! नागपूरमध्ये SBL कंपनीत स्फोट, १२ जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर

Big Breaking!नागपूरमध्ये SBL कंपनीत स्फोट, १२ जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
 

नागपूरमधील काटोल तालुक्याती राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या एक्स्प्लोजिव्ह कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. या भयानक दुर्घटनेत १२ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे. एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एसबीएल कंपनीत स्फोट नेमका कशामुळे झाला? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

काटोलमध्ये झालेल्या या भयानक दुर्घटेनत काही महिलांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमींची प्रकृती पाहता मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दुर्घटनेची तात्कळ दखल घेतली आहे. बावनकुळे यांनी प्रशासनाकडून या स्फोटाची माहिती घेतली असून तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुर्घटनेवेळी ३० कामगार हजर

काटोल तालुक्यातील राऊळगावजवळ येनवरामध्ये एसबीएल एनर्जीचे युनिट आहे. या कंपनीत विविध डेटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोजिव्ह, कास्ट बूस्टर्स, सिजमिक एक्स्प्लोसिव्ह्स याचे उत्पादन होते. यामधीलच एका युनिटमध्ये सकाळी सात वाजताच्या सुमारास अचानक स्फोट झाला. हा स्फोट झाला त्यावेळी वेगवेगळ्या युनिटमध्ये जवळपास ३० कर्मचारी कार्यरत होते. आतापर्यंत १२ जणांच्या मृत्यूबाबत माहिती समोर आलेली आहे.

स्फोटाचे भयंकर आवाज -
सकाळी स्फोटाचे आवाजाने राऊळगाव हादरले. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की आवाज आजूबाजूच्या गावांमध्येदेखील ऐकू आले. त्यामुळे अनेक जण घराबाहेर आले. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाने घटानस्थळाकडे धाव घेतली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. एसबीएलमधील सर्व युनिट बंद करण्यात आले असून बचावकार्य वेगात सुरू आहे.
 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.