घराबाहेरच्या वीज मीटरमधील 'ती' लाल बत्ती सतत का लुकलुकते? वेळीच सावध व्हा, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका
मुंबई : महिन्याच्या शेवटी हातात विजेचं बिल पडलं की अनेकांचे डोळे विस्फारतात. "एवढं बिल आलंच कसं?" हा प्रश्न प्रत्येक घरात विचारला जातो. आपण घरातील एसी, फ्रीज, पंखे किती वेळ चालले याचा हिशोब लावतो, पण आपल्या घराबाहेर लावलेल्या त्या छोट्याशा डिजिटल मीटरकडे आपलं लक्ष जात नाही. या मीटरवर एक छोटीशी 'लाल बत्ती' असते, जी सतत लुकलुकत असते.
आपल्याला वाटतं ती फक्त वीज चालू असल्याचं लक्षण आहे, पण खरं तर ही लाल बत्ती तुमच्या विजेच्या वापराचे अनेक गुपितं सांगत असते. जर तुम्ही या लुकलुकणाऱ्या दिव्याचा अर्थ नीट समजून घेतला, तर तुम्ही केवळ विजेचं बिलच कमी करू शकणार नाही, तर संभाव्य धोकेही टाळू शकाल. चला तर मग, जाणून घेऊया या 'लाल बत्ती'चा नेमका अर्थ काय.
काय आहे ही लाल बत्ती?
या लाल दिव्याला तांत्रिक भाषेत 'इम्पल्स इंडिकेटर' असं म्हणतात. तुम्ही मीटरवर नीट पाहिलं तर तिथे 1600 imp/kWh किंवा 3200 imp/kWh असं काहीतरी लिहिलेलं दिसेल. याचा सोपा अर्थ असा की, जर तुमच्या मीटरवर 3200 imp/kWh लिहिलं असेल आणि तो दिवा 3200 वेळा लुकलुकला, तर समजावं की तुमच्या घरात 1 युनिट वीज खर्च झाली आहे. या लुकलुकण्याच्या गतीवरूनच वीज कंपन्या तुमचं बिल किती येईल, याचा अचूक अंदाज लावतात.तुमच्या घरात किती वीज खर्च होत आहे, हे पाहण्यासाठी तुम्हाला कोणत्याही इंजिनिअरची गरज नाही. तुम्ही स्वतः या लाल दिव्याकडे पाहून ते ओळखू शकता.जेव्हा तुम्ही एसी, गिझर, हिटर किंवा वॉशिंग मशीन यांसारखी जड उपकरणं चालू करता, तेव्हा हा दिवा अत्यंत वेगाने लुकलुकू लागतो. याचा अर्थ तुमची वीज वेगाने खर्च होत आहे.फक्त पंखे किंवा एलईडी बल्ब चालू असताना हा दिवा संथ गतीने चालतो.जर तुम्ही घरातील सर्व बटणे बंद केली, तर हा दिवा लुकलुकणे थांबवतो. हे एका 'लाईव्ह डॅशबोर्ड'सारखं काम करतं.कोणता उपकर किती वीज खातोय? असं तपासा...तुमच्या घरातील एखादं जुनं उपकरण जास्त वीज ओढत आहे का? हे तपासण्याची एक सोपी पद्धत आहे.1. घरातील सर्व स्विच बंद करा. मीटरचा लाल दिवा थांबायला हवा.2. आता एक-एक करून उपकरण चालू करा. समजा फ्रीज चालू केल्यावर दिवा सामान्य वेगाने चालतोय, पण जुना एसी चालू करताच तो 'धडधड' वेगाने लुकलुकू लागला, तर समजावं की तो एसी आता तुमच्या खिशाला कात्री लावतोय. एखादं छोटं उपकरण असूनही जर तो दिवा वेगाने चमकत असेल, तर त्या उपकरणात बिघाड असू शकतो.'या' खुणा दिसल्या तर समजा धोक्याची घंटा आहे.काही वेळा घराचे सर्व दिवे, पंखे बंद असूनही मीटरवरची लाल बत्ती वेगाने लुकलुकत राहते. अशा वेळी सावध होणं गरजेचं आहेकरंट लीकेज: सर्व बटणं बंद असूनही जर मीटर वेगाने पळत असेल, तर तुमच्या घराच्या वायरिंगमध्ये कुठेतरी 'करंट लीक' होत आहे.वीज चोरी: कोणीतरी तुमच्या मीटरवरून चोरून वीज वापरत असण्याचीही शक्यता असते.अर्थिंग किंवा रिव्हर्स लाइट: आधुनिक मीटरमध्ये 'Earth' किंवा 'Reverse' असे वेगळे दिवे असतात. जर लाल दिव्यासोबत हे दिवेही जळत असतील, तर तुमच्या वायरिंगमध्ये मोठा दोष आहे आणि शॉर्ट सर्किट किंवा शॉक लागण्याचा धोका आहे.
आता पुढे काय करावे?
जर
सर्व उपकरणे बंद असतानाही लाल बत्ती शांत होत नसेल, तर त्वरित वीज
विभागाच्या (MSEDCL तक्रार केंद्रावर संपर्क साधा.) मीटरची तपासणी करून
घ्या आणि गरज पडल्यास परवानाधारक इलेक्ट्रिशियनकडून घराचे वायरिंग तपासा.
'ती' छोटीशी लाल बत्ती तुम्हाला वेळीच इशारा देत असते, फक्त तो समजून
घेण्याची गरज आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.