Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! रुपाली चाकणकर यांचा पाय खोलात, चाकणकर यांना SIT कडून समन्स, चौकशी होणार, मोठी अपडेट काय?

Big Breaking! रुपाली चाकणकर यांचा पाय खोलात, चाकणकर यांना SIT कडून समन्स, चौकशी होणार, मोठी अपडेट काय?


अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दिसते. त्यांना अगोदर महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर पाणी सोडावे लागले. आता त्यांना विशेष तपास पथकाने ( SIT) समन्स बजावल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अशोक खरात व्यतिरिक्त या प्रकरणात पहिल्यांदाच राजकीय व्यक्तीची चौकशी होणार आहे. चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना सहआरोपी करण्याची मागणी उद्धव ठाकरे सेनेच्या नेता सुषमा अंधारे आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली होती. याप्रकरणी सरकारवर मोठा दबाव आला होता. दोन्ही पदाचा राजीनामा दिल्यानंतर लागलीच रुपाली चाकणकर यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागल्याचे समोर येत आहे.

शिवानिका संस्थेच्या सदस्य रडारवर
दरम्यान शिवानिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एसआयटी सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती समोर येत आहे. रूपाली चाकणकर यांची देखील एसआयटी कडून आता चौकशी होण्याची शक्यता आहे. शिवानीका संस्थांचे सर्व व्यवहार आता SITच्या रडारवर आहे. दरम्यान समन्स म्हणजे आकाश पडलं असं नाही. तो चौकशीचा भाग असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
भोंदू खरात अगोदर पोलीस उपायुक्त कार्यालयात

विशेष कोर्टात घेऊन जाताना भोंदू अशोक खरातला पोलीस उपायुक्त कार्यालयात आणले. किरण कुमार चौहान यांच्या पोलीस उपायुक्त कार्यालय त्याला हजर करण्यात आले. या ठिकाणी काय युक्तिवाद करायचा यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची शक्यता आहे. गेल्या 10 मिनिटापासून भोंदू अशोक खरात पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आत होता. त्यानंतर त्याला नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. खरातचा मोबाईल फॉरेन्सिक अहवालही एसआयटीला प्राप्त झाला आहे. त्यातून या प्रकरणी अजून मोठा उलगडा होणार आहे.

खरात खरं सांगत नाही
अशोक खरात हा सत्य सांगत नसल्याचा युक्तीवाद पीडितेच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. याप्रकरणात अनेक कुटुंब उद्धवस्त झाल्याचे म्हणणे त्यांच्या वकिलांनी मांडले. आरोपी तपासात खरी उत्तरं देत नसल्याचे पीडितीच्या वकिलांनी म्हटले आहे. तर खरातच्या वकिलांनी त्याला पोलीस कोठडीची गरज नसल्याचे म्हणणे मांडले. अशोक खरातवर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील 9 गुन्हे हे लैंगिक शोषणाचे तर दोन गुन्हे हे फसवणुकीचे आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.