नशा कराल तर तुमचं लग्न होणार नाही, डोप टेस्ट म्हणजे काय? लग्नाच्या आधी अनिवार्य करण्याची संसदेत मागणी
आपचे खासदार मलविंदर सिंग कांग यांनी शुक्रवारी संसदेत महत्त्वाची मागणी केली. लग्नापूर्वी वर म्हणजेच मुलाची डोप टेस्ट (Drug Test) आणि वैद्यकीय तपासणी अनिवार्य करावी, असा त्यांनी प्रस्ताव मांडला. त्यांच्या मते, देशात घटस्फोट आणि घरगुती हिंसाचार वाढत आहेत. लग्नाआधी मुलीची सखोल चौकशी होते, पण मुलांबाबत अनेक गोष्टी दुर्लक्षित राहतात. त्यामुळे नशा, आजार किंवा वाईट सवयी लग्नानंतर समोर येतात आणि महिलांवर त्याचा परिणाम होतो. म्हणून सरकारने यावर कडक नियम करावेत, अशी त्यांनी मागणी केली. मात्र, ही डोप टेस्ट असते तरी काय आणि कशासाठी याचा वापर होतो ते जाऊन घेऊया.
डोप टेस्ट म्हणजे काय?
डोप टेस्ट म्हणजे शरीरात नशेचे किंवा मेंदूवर परिणाम करणारे (सायकोॲक्टिव्ह) पदार्थ आहेत का, हे तपासण्याची प्रक्रिया. हे पदार्थ व्यक्तीच्या विचारांवर, वागणूकीवर आणि भावनांवर परिणाम करू शकतात. क्रीडा क्षेत्रात ही तपासणी प्रामुख्याने स्पर्धा स्वच्छ आणि प्रामाणिक राहावी यासाठी केली जाते आणि World Anti-Doping Agency (WADA) सारख्या संस्थांकडून याचे नियम ठरवले जातात.
टेस्ट कशी केली जाते?
डोप टेस्टसाठी लघवी (urine), रक्त, लाळ, घाम किंवा केस-नखांचे नमुने घेतले जातात. यामध्ये लघवीचा नमुना सर्वाधिक वापरला जातो. सुरुवातीला एक प्राथमिक टेस्ट (इम्युनोअॅसे) केली जाते, ज्यातून पटकन अंदाज येतो. त्यानंतर खात्री करण्यासाठी अजून सखोल आणि महागडी चाचण्या केल्या जाताता ज्यांना गॅस क्रोमॅटोग्राफी आणि मास स्पेक्ट्रोमेट्री असं म्हटलं जातं.
कोणते पदार्थ बंदी आहेत?
हेरॉईन, मॉर्फिन, कोडीन, बुप्रेनॉर्फिन आणि ट्रामाडोल यांसारखी काही औषधे/अंमली पदार्थ बंदी घातलेल्या पदार्थांच्या यादीत येतात.
टेस्ट कधी आणि कुठे होऊ शकते?
राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना कधीही आणि कुठेही डोप टेस्टसाठी बोलावलं जाऊ शकतं. कोणता पदार्थ किती वेळेत ओळखता येतो, हे त्या पदार्थावर अवलंबून असतं. काही ड्रग्स ६ तासांपासून २ दिवसांपर्यंत ओळखता येतात.एकंदरीत, डोप टेस्ट ही खेळात प्रामाणिकपणा टिकवण्यासाठी आणि चुकीच्या मार्गाने फायदा घेणाऱ्यांना रोखण्यासाठी महत्त्वाची प्रक्रिया आहे. पंजाबमध्ये खेळाडू आणि ड्रग अॅडिक्ट या दोन्हीचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे आपचे खासदार मलविंदर सिंग कांग यांनी ही मागणी केलेली असू शकते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.सांगली दर्पण अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.