Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! अशोक खरात बड्या सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा, विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा

Big Breaking! अशोक खरात बड्या सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा, विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा


नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत लागेबांधे होते. तो या बड्या अधिकाऱ्यांना एकमेकांच्या फॅमिली शेअर  करायला सांगायचा, असा स्फोटक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार  यांनी केला. राज्य सरकार या अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही कारण त्यांना भीती वाटते, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले. ते सोमवारी नागपूरमध्ये  बोलत होते.

अशोक खरात याच्या मोबाईलमध्ये सांकेतिक भाषेत कोडवर्डमध्ये काही नेत्यांची नावं लिहली आहे. कारण खरात अनेकांचे काळे पैसे पांढरे करायचं काम करत होते. मात्र, त्याने काही फरक पडत नाही. जे या कृत्यात सहभागी आहे त्या सर्वांची चौकशी करायला पाहिजे. फक्त रुपाली चाकणकर यांना समन्स देऊन चालणार नाही, तर ज्या ज्या 49 आमदारांचे फोटो अशोक खरात सोबत आहे, त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

अनेक सरकारी अधिकारी आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना घेऊन अशोक खरात याच्याकडे जात होते. जे पती आपल्या पत्नीला खरात कडे पाठवत होते, ते पती पण तितकेच दोषी आहे. त्यांची पण चौकशी करून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. अधिकाऱ्यांच्या बायका खरातच्या केबिनमध्ये जायच्या, नवरे बाहेर बसून राहायचे: विजय वडेट्टीवार

अनेकांच्या मोठमोठ्या लोकांच्या बायका अशोक खरात याच्या ऑफिसमध्ये जात होत्या. त्यांचे नवरे बाहेर बसून राहायचे. हे अधिकारी भोंदूगिरीला, अंधश्रद्धेला समर्थन द्यायचे. बाकी आतमध्ये काय झाले, याबद्दल मी बोलणार नाही, त्याचे पुरावे माझ्याकडे नाहीत. सध्या समोर येणारे व्हिडीओ सिलेक्टेड आहेत. अशोक खरातच्या ऑफिसमध्ये सापडलेल्या पेनड्राईव्हमध्ये 1000 व्हिडीओ आहेत, पण त्यापैकी फक्त 150 व्हिडीओ समोर आले आहेत. ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाला त्यांच्या नवऱ्यावर कारवाई केली पाहिजे.

अशोक खरात हा अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायका शेअर करायला सांगायचा. हे किती घाणेरडं आणि महाराष्ट्राची इभ्रत काढणारं प्रकरण आहे. तरीही राज्यकर्त्यांना थोडीही लाज वाटत नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.