पाकिस्तानचा माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) कमर जावेद बाजवा याचे शनिवारी वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले. रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फेब्रुवारी महिन्यात घरातील बाथरूममध्ये घसरल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
बाजवाचा वादांनी गाजलेला कार्यकाळ
2016 ते 2022 या काळात लष्कराचे नेतृत्व करणाऱ्या जनरल बाजवा यांचा कार्यकाळ वादळी ठरला. माजी पंतप्रधान इम्रान खान याच्यासोबतचे त्यांचे मतभेद आणि २०२२ च्या सत्ता हस्तांतरणातील त्यांची भूमिका जागतिक चर्चेचा विषय बनली होती. इम्रान खानने जाहीर सभांमध्ये त्यांच्यावर तटस्थ राहून विरोधी पक्षाला मदत केल्याचा गंभीर आरोप केला होता, जो दावा लष्कराने सातत्याने फेटाळून लावला आहे.लष्करप्रमुखपदाच्या कार्यकाळात त्याच्या कुटुंबाच्या संपत्तीत झालेली प्रचंड वाढही वादग्रस्त ठरली होती.बाजवा यांच्या समर्थकांनी हे आरोप त्याची प्रतिमा मलीन करण्याचा कट असल्याचे सांगत फेटाळून लावले. तसेच बाजवा भारताला नंबर एकचा शत्रू मानत असे. त्याच्या निधनाने पाकिस्तानच्या राजकारण आणि सुरक्षा व्यवस्थेतील एका महत्त्वपूर्ण पर्वाचा अंत झाला आहे.
गेल्या महिन्यातच झाला होता अपघात
पाकिस्तान लष्कराने 11 फेब्रुवारी रोजी एका निवेदनात म्हटले आहे की, घरी पडल्यामुळे डोक्याला दुखापत झाल्याने कमर जावेद बाजवा यांच्यावर संयुक्त लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यावेळी, बाजवा यांच्या पत्नीचे भाऊ, नईम घुमान यांनी सांगितले होते की, अनवाणी असल्यामुळे बाजवा घसरले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. नईम यांनी सांगितले की, त्यांची वैद्यकीय तपासणी आणि सर्व आवश्यक चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी, नईम आणि त्यांच्या डॉक्टरांनी दावा केला होता की बाजवा धोक्याबाहेर आहेत. तथापि, नंतर असे समोर आले की त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली नव्हती आणि त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरूच होते.
2019 मध्ये मुदतवाढ देण्यात आली
65 वर्षीय बाजवा यांनी 29 नोव्हेंबर 2016 ते 29 नोव्हेंबर 2022 पर्यंत पाकिस्तान लष्कराचे 10 वे प्रमुख म्हणून काम पाहिले. 2019 मध्ये त्यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ देण्यात आली. 2022 च्या अखेरीस निवृत्त झाल्यापासून बाजवा सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिले आहेत, परंतु त्यांचा स्वतःचा प्रभाव असल्याचे मानले जाते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.