Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'मुलाला आपलं सर्वस्व देणं माझी चूक, पालकांनी फार सावधपणे विचार करा,' 'रेमंड मॅन'चा पालकांना सल्ला

'मुलाला आपलं सर्वस्व देणं माझी चूक, पालकांनी फार सावधपणे विचार करा,' 'रेमंड मॅन'चा पालकांना सल्ला


भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा उल्लेख करताच आपल्या ओठांवर आपसुक मुकेश अंबानी यांचं नाव येतं पण, कधीकाळी एक व्यक्ती अशी होती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या सगळ्यांपेक्षाही श्रीमंत होती. मात्र त्यांच्या एका चुकीमुळे 12000 कोटींची मालमत्ता हातातून गेली अन् आयुष्याच्या शेवटपर्यंत भाड्याचा घरात राहणं भाग पडलं.

'रेमंड मॅन' विजयपत सिंघानिया यांचे निधन
रेमंडचे माजी चेअरमन विजयपत सिंघानिया यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले आणि रविवारी 29 मार्च रोजी मुलगा गौतम सिंघानियाने मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. एक काळ असा होता जेव्हा विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम यांच्या संबंधात कटुता आली होती. त्यावेळी एका मुलाखतीत विजयपत यांनी म्हटले होते की, रेमंडची सूत्रे आपल्या मुलाच्या हाती सोपवून त्यांनी मोठी चूक केली आहे.
विजयपत सिंघानिया यांचा पालकांना मोलाचा सल्ला

विजयपत सिंघानिया यांनी 2015 मध्ये आपला मुलगा गौतम यांच्याकडे रेमंडची मालकी सोपवली, जी त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. आपल्या या निर्णयावर बोलताना सिंघानिया यांनी एका मुलाखतीत अनेक वर्षांपूर्वी 'ही एक मूर्ख चूक होती' असं मान्य केलेलं. आपण हयातीत असताना आपल्या मुलाला सर्व काही देणं ही फार मोठी चूक असल्याचं विजयपत सिंघानिया यांनी म्हटलेलं. तसेच आई-वडिलांनी आपल्या मुलांना सर्व काही देण्यापूर्वी फार सावधपणे विचार केला पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.
आपल्या वडिलांकडून कौटुंबिक व्यवसायाचा वारसा हक्क मिळाल्याच्या दोन वर्षांनी म्हणजे 2017 मध्ये गौतम सिंघानिया यांनी मुंबईतील रेमंड हाऊस किंवा JK House या राहत्या घरातून विजयपत सिंघानिया यांना हाकलले होते. बाप-लेकात एका फ्लॅटवरून प्रकरण इथवर पोहोचलं की विजयपत यांना आपलं घर सोडून मुंबईत एका सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे भाड्याच्या घरात राहणे भाग पडले.
मुलाखतीदरम्यान दिवंगत विजयपत सिंघानिया म्हणाले, "मुलाने बाहेर काढल्यानंतर माझ्याकडे कोणतंच काम राहिलं नाही. गौतम कंपनीतील काही भाग देण्यास तयार झाला होता, पण नंतर त्याने माघार घेतली. मी त्याला सर्व काही दिलं होतं पण, चुकून माझ्याकडे काही पैसे राहिले. याच पैशांवर सध्या माझा निवारा होत आहे. मी आज वाचलो आहे, अन्यथा रस्त्यावर असतो. जर तो वडिलांना बाहेर काढू शकतो, तर पत्नीलाही काढू शकतो. मला नेमकं काय झालं आहे याची कल्पना नाही."

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.