काही सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेत दुबार नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बँक खात्यात दुबार वेतन जमा झाले आहे, असे प्रकार टाळण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हा नियम राज्यातील 18 लाखांहून अधिक सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला आहे. हा निर्णय काय आहे, ते जाणून घेऊया
संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्र द्या!
सरकारी सेवेत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना ईकेवायसी करणे बंधनकारण करण्यात आले आहे. ईकेवायसी केलेल्या अधिकारी, कर्मताऱ्यांना पुढच्या महिन्याचा पगार मिळणार आहे. वित्त विभागाने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. पगार देताना कोणताही गैरप्रकार होऊ नये, कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना दुबार वेतन दिले जाऊ नये, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले. प्रत्येक कर्मचाऱ्याला ईकेवायसी पूर्ण करुन त्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहे.
वित्त विभागाकडून आदेश
मान्यताप्राप्त व अनुदानित शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व जिल्हा परिषदा, शालेय शिक्षण विभाग (शालार्थ प्रणाली), महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये, कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित शासकीय महाविद्यालये, आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या मान्यताप्राप्त व अनुदानित आश्रमशाळा व संस्था, वैद्यकीय विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षण/कौशल्य विकास विभागाच्या आधिनस्त संस्था, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील संस्था यामधील अधिकारी व कर्मचाऱयांनाही राज्याच्या वित्त विभागाकडून ईकेवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेतील फसवणुकीमुळे नियम
राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचं याआधीही अनेक वेळा समोर आलंय. कुठे अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय तर कुठे पुरुषांनी लाडकी बहीण योजनेवर डल्ला मारलाय. सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आले आहे. या प्रकारानंतर सरकारने हे पाऊल उचललं असल्याचे समजते. परिणामी राज्यातल्या 18 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱयांना आता ई-केवायसी सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी करा ईकेवायासीनुसार नोंद
सरकारी कर्मचाऱ्यांना ईकेवायसीसाठी सेवार्थ प्रणालीचा वापर करावा लागणार आहे.सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची माहिती देण्यात आली आहे.कर्मचाऱ्यांचे अकाउंट नंबर, आधार नंबर, पॅन कार्ड अशी सर्व माहिती लिहिलेली आहे.ईकेवायसी न केल्यास कर्मचाऱ्यांना एप्रिल आणि मे महिन्याचा पगार दिला जाणार नाही.कर्मचाऱ्यांची ईकेवायसीअंतर्गत नव्याने नोंद होणार आहे.ईकेवायसी करण्याआधी आधार आणि बँक खाते लिंक असणे अनिवार्य आहे.त्यामुळे तुम्ही जर हे काम केले नसेल तर लगेच करा.जर बँक खाते आधारशी संलग्न नसेल तर त्वरित बदलावे लागणार आहे.पॅन क्रमांक चूकीचा असेल तर नोंदविण्यात आलेला पॅन क्रमांक अद्ययावत करावे लागणार आहे.व्यक्तीश: ईकेवायसी पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहे.संबंधित अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्याची सेवार्थ प्रणालीत ईकेवायासीनुसार नोंद केली जाणार आहे.यानंतरच तुम्ही दिलेले बँक खाते आणि सेवार्थ प्रणालीतील बँक खाते सारखे असेल तर पुढे वेतन मिळणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.