Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! सर्वसामान्यांना युद्धाचा मोठा झटका! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू होण्याची शक्यता

Big Breaking! सर्वसामान्यांना युद्धाचा मोठा झटका! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू होण्याची शक्यता


नवी दिल्ली: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. ७ मार्च, शनिवारपासून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची, तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.

एप्रिल २०२५ नंतर पहिल्यांदाच गॅसच्या किमतीत इतकी मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या गॅसच्या किमती अचानक वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. नवीन दर आजपासूनच लागू झाले आहेत. दिल्लीप्रमाणेच मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांमध्येही किमतीत वाढ झाली असून स्थानिक टॅक्सनुसार ही किंमत थोडीफार वेगळी असू शकते. केवळ घरगुतीच नाही, तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या खाद्य विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसणार असून, परिणामी बाहेरचे खाणेही महाग होऊ शकते.

दरवाढीचे कारण काय?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमतींमध्ये होत असलेले बदल आणि रुपयाचे मूल्य यांमुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दर महिन्याच्या १ तारखेला किंवा विशेष परिस्थितीत तेल कंपन्या गॅसच्या किमतींचा आढावा घेतात आणि त्यानुसार दर जाहीर करतात. घरगुती सिलिंडरचे नवे दर (१४.२ किलो): पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार, देशातील प्रमुख शहरांमधील किमती खालीलप्रमाणे आहेत:

दिल्ली: ८५३ रुपयांवरून आता ९१३ रुपये.

मुंबई: ८५२.५० रुपयांवरून आता ९१२.५० रुपये.

चेन्नई: ८६८.५० रुपयांवरून आता ९२८.५० रुपये.

व्यावसायिक (Commercial) सिलिंडरही महागला:

हॉटेल, रेस्टॉरंट आणि छोट्या व्यावसायिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत ११५ रुपयांची वाढ झाली आहे.

दिल्ली: १८८३ रुपये.

मुंबई: १८३५ रुपये.

कोलकाता: १९९० रुपये.

चेन्नई: २०४३.५० रुपये.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.