बांगलादेशातील पद्मा नदीत बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात २३ प्रवाशांचा मृत्यू झाला. बुधवारी (२५ मार्च) राजबरी जिल्ह्यात ही घटना घडली. मदत आणि शोध कार्य सुरूच असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. बस नदीत कोसळत असतानाची ही घटना मोबाईलमध्ये शूट झाली आहे. हा व्हिडीओ समोर आला असून, बस नियंत्रणाबाहेर गेली आणि नदीत कोसळताना दिसत आहे. २३ जणांचा मृत्यू या घटनेत झाला असून, त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
बस नदीत कोसळतानाचा व्हिडीओ
पद्मा नदीवर असलेल्या दौलतदिया बंदरावर ही घटना घडली आहे. ढाका येथील असलेली बस फेरी बोटीवर चढवली जाणार होती. सायंकाळी ५.१५ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चालकाचे स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बस फेरीच्या दिशेने जाण्याऐवजी बाजूला गेली आणि नदीत कोसळली. बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील बहुतांश प्रवासी ईदची सुट्टी संपल्यामुळे ढाकाला निघाले होते. मदत आणि शोध मोहीम हाती घेतल्यापासून २३ मृतदेह मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.