सांगली: मा. ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान महावीर जयंती निमित्त सांगली येथे "योजना साक्षरता शिबिर व सेवा सुविधा शिबिर" उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. हे शिबिर श्री पार्श्वनाथ जैन मंदिर, पार्श्वनाथ नगर (लक्ष्मी नगर), कुपवाड रोड, सांगली तसेच श्री १००८ पार्श्वनाथ जैन मंदिर, गाव भाग, सांगली या दोन ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व परिसरातील अनेक नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला.
या शिबिराचे नियोजन योजना प्रमुख विजय वरुडकर यांनी केले. शिबिरामध्ये आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड, उद्यम आधार नोंदणी, मतदान नोंदणी, अपंग प्रमाणपत्र, फार्मर आयडी तसेच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. जैन प्रकोष्ठ प्रदेश उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील, पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रमुख श्री प्रशांत गोंडाजे, भाजप जैन प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष श्री महावीर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होतीतसेच गावभाग येथील शिबिरावेळी श्री अजित पाटील, श्रेयांश पाटील, शांतिनाथ कर्वे, बाबुराव पाटील व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पार्श्वनाथ नगर येथील शिबिरावेळी श्री महावीर खोत, श्री अमित चिंचवडे व श्री बाहुबली देसाई अश्विनी पाटील, संजय पाटील उपस्थित होतेया शिबिरास भाजप जैन प्रकोष्ठ, वीर सेवादल, महिला मंडळ तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली. या शिबिरामुळे शासनाच्या विविध योजनांची माहिती व सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचली असून, अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.