Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रुपाली चाकणकरांनी अनू मलिकलाही वाचवलं', सुषमा अंधारेंनी फोटो दाखवत दिला पुरावा

रुपाली चाकणकरांनी अनू मलिकलाही वाचवलं', सुषमा अंधारेंनी फोटो दाखवत दिला पुरावा


महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर  यांनी अशोक खरात प्रकरणामुळे पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतरही रुपाली चाकणकर यांच्याबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करुन चाकणकर आपलाच हेतू साध्य करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या सगळ्या प्रकरणात अनेक महाराष्ट्रातील बड्या नेत्यांचं नाव आलं आहे. महिला आयोगच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचं आढळल्यावर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. असं असताना शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आणखी काही धक्कादायक आरोप केले आहे. सुषमा अंधारेंचा असा आरोप आहे की, रुपाली चाकणकर यांनी महिलांची मदत करण्याऐवजी आपला स्वार्थ जपल्याच म्हटलं आहे.

अनू मलिक यांच्याविरोधात कारवाई का नाही?
सुषमा अंधारे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, अनू मलिक यांच्या विरोधात अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी रुपाली चाकणकर यांच्याकडे केली होती. तरी देखील चाकणकरांनी कोणतीही कारवाई न करता त्या महिलांना न्याय मिळवून दिला नाही. यानंतर सुषमा अंधारे यांनी असा आरोप केला की, रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर याच्या 'विरजण' या सिनेमाच म्युझिक लाँच अनू मलिक यांच्या उपस्थितीत झालं. यावेळी त्या कार्यक्रमाला रुपाली चाकणकर देखील उपस्थित होत्या.

अनु मलिक यांच्यावर 3 महिलांनी Me Too च्या प्रकरणात तक्रार केली होती. ही तक्रार रुपाली चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून केली होती. पण रुपाली चाकणकरांनी अनु मलिक यांना क्लिन चिट दिली. याबदल्यात अनु मलिक यांनी रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकरच्या सिनेमाचं म्युझिक लाँच केलं होतं.
MIDC शी काय संबंध?

सुषमा अंधारे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकर यांच्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत. यामध्ये रुपाली चाकणकर आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे दोघं MIDC च्या कार्यालयात बसलेला फोटो दाखवला. यावरुन सुषमा अंधारेंनी सवाल केला की, MIDC च्या ऑफिसमध्ये चाकणकर आणि केसरकर काय करत आहेत? असा सवालही केला आहे. चाकणकरांच्या खात्याशी याचा काय संबंध असा प्रश्न देखील विचारला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.