Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकेकाळी अजितदादांच्या 'गुडबुक'मध्ये राहिलेल्या 'आयएएस' अधिकाऱ्याची अचानक स्वेच्छानिवृत्ती, सरकारने आदेशही काढले

एकेकाळी अजितदादांच्या 'गुडबुक'मध्ये राहिलेल्या 'आयएएस' अधिकाऱ्याची अचानक स्वेच्छानिवृत्ती, सरकारने आदेशही काढले


एकेकाळी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'गुडबुक'मध्ये राहिलेले आणि धडाकेबाज 'आयएएस' अधिकारी कुणाल कुमार यांनी अचानक प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. या मार्च अखेरनंतर ते स्वेच्छा सेवानिवृत्त होणार आहे. याबाबतचे आदेश केंद्र सरकारकडून काढले आहेत.
कुणाल कुमार हे 1999 च्या बॅचचे आयएएस अधिकारी राहिले आहेत. ते सध्या राज्य सरकारच्या मुंबई येथील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहे. यापू्र्वी त्यांनी पुणे महापालिकेचे माजी आयुक्त पदावरही काम केले असून त्यांच्या कार्यकाळात अनेक अभिनव उपक्रमही राबवले होते. प्रशासनावर वचक ठेवणाऱ्या अजित पवार यांच्या गुडबुकमधील अधिकारी म्हणून कुणाल कुमार ओळखले जात होते.
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कुणाल कुमार यांनी 2014-2018 या कालावधीत काम पाहिले आहे. स्मार्ट सिटी मोहीम, चोवीस तास पाणीपुरवठा आणि डिजिटल उपक्रमांसह त्यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांसह आयुक्तपदावर काम करताना आपली वेगळी छाप सोडली होती. पुण्यात सर्वाधिक काळ आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. यानंतर केंद्र सरकारच्या गृहनिर्माण मंत्रालयात त्यांची सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
प्रशासनात कुणाल कुमार यांची ओळख ही शिस्तप्रिय कार्यशैलीसाठी आणि कठोर निर्णय घेणारे आयएएस अधिकारी म्हणून राहिली आहे.1999 पासून महाराष्ट्र राज्यात कार्यरत असताना त्यांनी गडचिरोली, नागपूर, भंडारा, कोल्हापूर आणि जळगाव यांसारख्या महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये अनेक विभागांमध्ये सेवा बजावली आहे. त्यांनी जळगाव, भंडारा आणि औरंगाबाद या शहरांमध्ये सुमारे 6 वर्षे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.
आयएएस अधिकारी कुणाल कुमार यांच्याकडे भू-महसूल व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी नागपूर महानगरपालिकेत सुमारे 2 वर्षे अतिरिक्त आयुक्त आणि कोल्हापूर महानगरपालिकेत सुमारे ३ वर्षे आयुक्त म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे त्यांना शहरी विकास आणि नगरपालिका प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.