Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महसूल विभागात खळबळ! 'बडा मासा' एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकला; प्रांताधिकाऱ्यांवरच होणार कठोर कारवाई

महसूल विभागात खळबळ! 'बडा मासा' एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकला; प्रांताधिकाऱ्यांवरच होणार कठोर कारवाई

पुणे जिल्ह्यातील जुन्नर-आंबेगाव विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी गोविंद शिंदे यांना रंगेहात पकडले आहे. त्यांच्या कार्यालयातील एका लिपिकासह त्यांना २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, एका इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला  मिळवण्यासाठी तक्रारदाराने प्रांताधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. यासाठी गोविंद शिंदे यांनी २ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. 

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने शुक्रवारी मंचर येथील प्रांताधिकारी कार्यालयात सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून २ लाख रुपये स्वीकारताना शिंदे आणि संबंधित लिपिकाला पकडण्यात आले. 
या प्रकरणात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे. दरम्यान, या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. 

भ्रष्टाचाराविरुद्ध ‘एसीबी’चा दणका 
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या काही दिवसांपासून शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराविरुद्ध कडक मोहीम उघडली आहे. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यावर झालेली ही कारवाई इतर भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणणारी ठरली आहे. नागरिकांनी अशा प्रकारे लाचेची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.