सांगलीला मिळाले नवे जिल्हाधिकारी; अत्यंत संवेदनशील अन् कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या हातात जिल्ह्याची सूत्र
सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉक्टर मैनक घोष यांची नियुक्ती करण्यात आली असून ते सध्या धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान, मैनक घोष यांच्या जागी प्रियंवदा महाडळदकर यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या नव्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियंवदा या मुळच्या रत्नागिरीच्या असून 2022 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. महाराष्ट्रातून त्यांनी 13 वा क्रमांक मिळवला आहे. सांगलीच्या जिल्हाधिकारीपदावर नियुक्ती झालेले डॉ. मैनक घोष हे मुळचे पश्चिम बंगालचे असून 2019 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. अत्यंत संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख
गतवर्षी धाराशिव जिल्ह्यात महापूर आला असताना एक IAS अधिकारी कसा असावा याचं प्रत्यंतर मैनक घोष यांनी दिले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मैनक घोष हे पूरग्रस्तांच्या मदतीला धावले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.