Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्य सरकारकडून IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचा धडाका, 8 बड्या अधिकाऱ्यांच्या जागा बदलल्या

राज्य सरकारकडून IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचा धडाका, 8 बड्या अधिकाऱ्यांच्या जागा बदलल्या


मुंबई: एकीकडे अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. अशोक खरात याचे काही शासकीय अधिकाऱ्यांसोबत संबंध असल्याचं उघड झालं आहे. दोनच दिवसांपूर्वी अभिजीत भांडे पाटील यांची बदली करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा राज्य सरकारने ८ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यामध्ये जिल्हाधिकारी आणि आयुक्तांचा समावेश आहे.

राज्य सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचा धडाका लावला आहे. दिनांक २७ मार्च २०२६ रोजी बदलीचे आदेश काढण्यात आले आहे. यामध्ये महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या रुबल प्रखेर अग्रवाल यांची मुंबईतच कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

पुणे महिला आणि बाल आयुक्त नयना गुंडे (IAS:SCS:2008) यांची अमरावतीच्या अमरावती विभागात बदली करण्यात आली आहे.

अमरावतीच्या विभागीय आयुक्त असलेल्या श्वेता सिंघल (IAS:RR:2009) यांची आता व्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई म्हणून बदली झाली आहे.

सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे (IAS:SCS:2010) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी), मुंबई म्हणून बदली करण्यात आली आहे आहे.

तर धाराशिवच्या जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या डॉ. मैनक घोष (IAS:RR:2019) यांची सांगली इथं जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रियंवदा म्हाड्डळकर (IAS:RR:2022) यांची जिल्हा परिषद, धाराशिव इथं मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राहुल रेखवार (IAS:RR:2011) यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबईत सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

एम. देवेंद्र सिंग (IAS:RR:2011) यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.