डॉक्टरांचा हलगर्जीपणा, बेजबाबदारपणामुळे अनेकदा रुग्णाला नाहक त्रास सहन करावा लागतो. अशीच धक्कादायक घटना पंढरपूरमधून समोर आली आहे. पंढरपुरात सहा वर्षाच्या मुलाच्या शस्त्रक्रियेत मोठा हलगर्जीपणा करण्यात आला आहे. एका अल्पवयीन मुलाच्या उजव्या हाताच्या बोटाऐवजी शस्त्रक्रिया करून डाव्या हाताचे बोटच काढल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातून एक धक्कादायक घटना पुढे येत आहे. एका सहा वर्षे मुलाच्या शस्त्रक्रियेत उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचे बोट काढून टाकण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे डॉक्टरांचा हलगर्जीपणा पुढे येत आहे. याप्रकरणाने मुलाच्या पालकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे चूक घडल्यानंतर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.शाहू सुनील दंदाडे या सहा वर्षे मुलाला दोन्ही हाताला सहा बोटे आहेत. यातील उजव्या हाताचे बोट दुखत असल्याने तो काढून टाकण्याचा निर्णय झाला. या शस्त्रक्रिया दरम्यान उजव्या ऐवजी डाव्या हाताचे बोट डॉक्टरांकडून काढण्यात आल्याची तक्रार दंदाडे कुटुंबीयांची आहे. डॉक्टरांना सांगूनही त्यांनी हलगर्जीपणामुळे डाव्या हाताचे बोट काढले.
तसेच डॉक्टरांनी ते बोटही कधीतरी काढावेच लागले असते असे म्हणत उडवाउडवीची उत्तरे दिली, असाही गंंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र उजव्या ऐवजी डाव्या हाताचे बोट काढल्याच्या आरोपामुळे पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.