आटपाडीतील देशमुखवाडी इथं एका ४० वर्षीय तरुणाची लग्नाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून एका आरोपीला अटक करण्यात आलीय. पीडित तरुणाचं लग्न होत नसल्यानं मध्यस्थ सचिन बाबर याने नवरी शोधून देऊ असं सांगितलं. मात्र कोणताही गाजावाजा न करता लग्न करण्याची अट घातली. त्यानुसार एका मंदिरात जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न लागलं. मात्र त्याच रात्री नवरीने नवरदेवाला गुंगीचं औषध पाजून पोबारा केला. तिने जाताना सोबत दागिने आणि लाखोंची रोकड पळवली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आटपाडी येथील एका चाळीस वर्षे तरुणाला लग्नाच्या नावाखाली दहा लाखाला गंडा काढण्याचा प्रकार घडला आहे. नवनाथ देशमुख वय 40 असे तरुणाचं नाव आहे. त्यांने या फसवणुकीची तक्रार आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. नवनाथ देशमुख याचा विवाह करायचा होता. अनेक दिवसांपासून नवरीचा शोध सुरू होता. मात्र नवरी मिळत नव्हती.
दरम्यान, तरुणाची आटपाडीत बसस्थानकावर सचिन बाबर याच्याशी भेट होते. रखडलेला लग्नावर दोघाच चर्चा झाली. त्याने नवरी शोधून देण्याचा शब्द दिला. मात्र गाजा वाजा न करता मंदिरात विवाह करण्याची अट घातली. त्याप्रमाणे सचिन बाबर यांने वैशाली शेवाळे नावाची तरुणी नवरी म्हणून दाखवली. नवनाथ देशमुख याला ती पसंत पडली. लग्न ठरवलं. सोन्याची कपड्यांची खरेदी केली. त्याप्रमाणे मासाळवाडीत महादेव मंदिरात हे लग्न झालं.
मंदिरात हळदी समारंभ झाला, अक्षदा पडल्या. देवदर्शन घेतले आणि ते जोडीने घरी आले. मात्र रात्री धक्कादायक प्रकार घडला. नवरी म्हणून आलेली वैशाली शेवाळे हिने जेवणात गुंगीच औषध टाकलं. त्यामुळे नवनाथ देशमुख गाढ झोपला. इकडे नवरी म्हणून आलेल्या वैशाली शेवाळे हिने कपाटात ठेवलेले अडीच लाख रुपये आणि लग्नात अंगावर घातलेले सोन्या-चांदीच्या दागिन्यासह पसार झाली.सकाळी जाग आल्यावर नवनाथ याला नवरी म्हणून आलेली वैशाली शेवाळे दिसली नाही. दुसरीकडे कपाट सारं उघड होतं. याचा जबर धक्का बसला. त्याने शोध घेतला आणि चौकशी केली तरी काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर त्यांने तात्काळ आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली घडलेल्या साऱ्या प्रकाराची तक्रार दाखल केली आहे.
पीडित तरुणाने नवरीसाठी मध्यस्थी करणाऱ्या सचिन बाबर याला स्वतःच पकडून आणून पोलीस ठाण्यात हजर केले आहे . तर वैशाली शेवाळे हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. नागेश गायकवाड पीडित तरुणाचे आई-वडील वयोवृद्ध आहेत. त्यामुळे घरच्यांनाही सगळ्या प्रकाराची कुणकुण लागली नाही. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर एकाला अटक केली आहे. आता नवरीचा आणि इतरांचा शोध घेतला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.