Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले! नवीन सिलिंडरसाठी किती दिवस वाट पाहावी लागणार?

गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले! नवीन सिलिंडरसाठी किती दिवस वाट पाहावी लागणार?


घरगुती गॅस (LPG) वापरकर्त्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IndianOil) ने बुकिंगच्या नियमांमध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल केले आहेत. गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी आणि सर्वसामान्यांपर्यंत गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आता दोन सिलिंडरमधील 'वेटिंग पिरीयड' वाढवण्यात आला आहे. म्हणजेच जर तुम्ही ठराविक वेळेआधी बुकिंग करण्याचा प्रयत्न केला, तर सिस्टीम तुमचे बुकिंग स्वीकारणार नाही.

नवीन नियमांनुसार बुकिंगमधील अंतर
एक सिलिंडर असलेले ग्राहक- 25 दिवस
दोन सिलिंडर- 35 दिवस
उज्ज्वला योजना लाभार्थी- 45 दिवस
छोट्या सिलिंडरसाठीही नियम लागू

5 आणि 10 किलोच्या छोट्या सिलिंडरसाठीही नवीन कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.5 किलो सिलिंडर बुकिंगसाठी 9 ते 16 दिवसांचे अंतर तर किलो 10 सिलिंडरसाठी 18 ते 32 दिवसांचे अंतर असणे अनिवार्य आहे. महत्त्वाचे म्हणजे कालावधी तुमच्या मागील बुकिंगच्या तारखेपासून नाही, तर सिलिंडर डिलिव्हरी  झाल्याच्या तारखेपासून मोजला जाणार आहे.

बदल का करण्यात आले?
सरकार आणि गॅस कंपन्यांच्या मते, या नियमांमुळे गॅसचा गैरवापर आणि काळाबाजारी रोखण्यास मदत होईल. अनेकदा व्यावसायिक वापरासाठी घरगुती सिलिंडर वळवले जातात, त्याला या नियमामुळे लगाम बसेल. यामुळे गरजू ग्राहकांना वेळेवर गॅस उपलब्ध होईल आणि पुरवठा साखळीत पारदर्शकता येईल. शहरी भागात राहणाऱ्या आणि ज्यांच्याकडे दोन सिलिंडरचे कनेक्शन आहे, अशा कुटुंबांना या नियमाचा सर्वाधिक फटका बसू शकतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.