Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाची जाणीवपूर्वक अवज्ञा केल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.

तालुक्यातील रहिवासी व पंचायत समिती वरूड येथे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पदावर कार्यरत असलेले विलास जगन पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून उच्च न्यायालयाने २२ डिसेंबर २०२५ रोजी सदर याचिका दाखल करून घेत संबंधित सीईओ संजिता महापात्रा यांना उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

विलास पाटील हे ई गर्व्हनन्स सोल्यूशन्स प्रा. लि. या कंपनीमार्फत वरूड पंचायत समिती येथे १ जानेवारी २०१९ पासून सहाय्यक कार्यक्रम अधिकारी या पदावर करारावर कार्यरत होते. सोबत ते पत्रकारितेचेही काम करीत होते. त्यांच्या पत्रकारिता व्यवसायाचा आधार घेत तत्कालीन सीईओ यांनी ८ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांना निलंबित केले. या निलंबन आदेशाला पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून आव्हान दिले. न्यायमूर्ती अविनाश घारोटे व न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने १७ फेब्रुवारी २०२५ रोजी निकाल देताना अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. न्यायालयाने म्हटले की पाटील हे करार कर्मचारी असल्याने जिल्हा परिषद व पाटील यांच्यात नियोक्ता व कर्मचारी संबंध अस्तित्वातच नाही. २५ ऑगस्ट २०२१ च्या शासन निर्णयाच्या कलम ५ नुसार करारावरील कर्मचार्याला निलंबित करण्याचा अधिकार संबंधित अधिकाऱ्याला नाहीच.

राज्याने २३ ऑगस्ट २०२२ च्या पत्रान्वये सीईओला निलंबन करण्यास सांगितले असले, तरी शासन निर्णयात निलंबनाची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे ८ सप्टेंबर २०२२ चा निलंबन आदेश बेकायदेशीर असून तो रद्द व अवैध ठरवण्यात येतो, असे आदेशात नमूद आहे. ही याचिका मंजूर करत उच्च न्यायालयाने निलंबन आदेश कॅश करून पाटील यांना पूर्वपदावर पुनर्नियुक्त करण्याचा आदेश दिला. उच्चन्यायालयाचा निकाल स्पष्ट असूनही जिल्हा परिषद सीईओ महापात्रा यांनी पाटील यांची पुनर्नियुक्ती केली नाही. मार्च २०२५ ते आजपर्यंत पाटील यांना वेतनही देण्यात आले नाही. त्यामुळे पाटील यांनी अधिक्ता ए. ए. पन्नासे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.

संबंधित प्रकरण नेमके काय आहे, ते माहित नाही. संबंधित विभागाकडून प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली जाईल, अशी माहिती याचिकेबाबत सीईओ संजिता महापात्रा यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.