Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एपस्टीनचा 'टायटॅनिक' पोझमधला वॉशिंग्टनमध्ये पुतळा; व्हिडीओ व्हायरल, पाहा

एपस्टीनचा 'टायटॅनिक' पोझमधला वॉशिंग्टनमध्ये पुतळा; व्हिडीओ व्हायरल, पाहा


एपस्टीन फाईल्समधून करण्यात आलेल्या विविध खुलाशांमुळे जगात एकच खळबळ निर्माण झाली. जगभरातील नामांकीत लोकांच्या नावांचा यात उल्लेख केल्याचे उघडकीस आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही यात नाव आले आहे. अशात डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टीन यांच्या व्यक्तिरेखांची कलाकृती लक्ष वेधून घेत आहे. 'टायटॅनिक' पोझमध्ये असलेला दोघांचा पुतळा वॉशिंग्टन, डीसीमध्ये उभारण्यात आला आहे.

सीक्रेट हँडशेक कलाकारांची कलाकृती
आयकॉनिक टायटॅनिक पोझमध्ये उभारण्यात आलेला हा पुतळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 'सीक्रेट हँडशेक' नावाच्या एका कलाकार समूहाने हा पुतळा उभारला असल्याचे वृत्त आहे. जेफ्री एपस्टीनचा लैंगिक गुन्हेगारी घटनांमध्ये असलेला सहभाग आणि त्याच्याशी निगडीत जगभरातील राजकीय आणि जगप्रसिद्ध नागरिकांचे संबंध वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. ट्रम्प देखील या आरोपांच्या केंद्रस्थानी असताना वॉशिंग्टन, डीसी येथील हा पुतळा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. निषेध म्हणून हा पुतळा उभारण्यात आला आहे.
ट्रम्प यांचे एपस्टीन फाईलमध्ये नाव

अमेरिकेच्या विधी विभागाने जेफ्री एपस्टीनशी निगडीत लाखो कागदपत्रे आणि फोटो गेल्या महिन्यात प्रसिद्ध करण्यात आले. यात डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव समोर आले होते. ट्रम्प यांचे एपस्टीनशी नाव जोडल्यानंतर अमेरिकेसह जगभरात खळबळ निर्माण झाली. ट्रम्प यांनी सर्व दावे फेटाळून लावत या प्रकरणात निर्दोष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. ट्रम्प यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराच्या आरोप त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावले होते.

यापूर्वीही प्रतिकात्मक पुतळ्यांची उभारणी
ट्रम्प आणि एपस्टीन यांचे संबंध दर्शवणारे विविध पुतळे आणि कलाकृती यापूर्वी देखील अमेरिकेत दिसून आल्या होत्या. दरम्यान, प्रशासनाने तत्काळ कारवाई करत वादग्रस्त शिल्प हटवले होते. एपस्टीन फाईल्समध्ये बिल क्लिंटन, बिल गेट्स, एलन मस्क, स्टीफन हॉकिंग, मायकल जॅक्सन यासह अनेकांची नावे आली आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.