Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खारट पाणी अन् प्रसादाचा पेढा.. हे पदार्थ खाताच महिला व्हायच्या बेभान, असं काय मिसळायचा त्यात खरात? पोलिसांनी म्हटले..

खारट पाणी अन् प्रसादाचा पेढा.. हे पदार्थ खाताच महिला व्हायच्या बेभान, असं काय मिसळायचा त्यात खरात? पोलिसांनी म्हटले..


नाशिक:  सिन्नरचा भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्याने संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून अनेक राजकारणीही यामुळे अडचणीत आले आहेत. या प्रकरणात दररोज वेगवेगळे खुलासे होत असून खारट व कडवट चवीचे पाणी देऊन खरात महिलांवर अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे.
त्याचबरोबर तो महिलांना प्रसाद म्हणून एक पेढा खायला द्यायचा, त्यानंतर महिला बेभान व्हायच्या व तो सांगेल त्याप्रमाणे वागायच्या. त्या पेढ्यात व पाण्यात काय मिसळत असे, याचा शोध पोलीस घेत आहेत. अशोक खरातने अनेक महिलांवर अत्याचार केले आहेत. त्याच्या वासनेतून अल्पवयीन मुली व गर्भवती महिलाही सुटल्या नाहीत. अशोक खरात विरोधात बलात्काराच्या 8 केसेस दाख आहेत. या लैंगिक शोषण प्रकरणातील धक्कादायक तपास एसआयटी (SIT) च्या हाती आहे.

भविष्य जाणून घेण्यासाठी येणाऱ्या महिलांना खरात एक विशेष प्रकारचे पेय द्यायचा. हे पाणी खारट तसेच कधी कडवट असे. या पाण्यासोबत तो पेढेही खायला द्यायचा. हे पदार्थ खाल्ल्यानंतर महिलांना काही वेळातच मळमळणे, डोके गरगरणे, चक्कर येणे डोके जड होणे आदि त्रास सुरू व्हायचा. त्यानंतर खरात केबिनमधील दिवे घालवून अर्धवट बेशुद्ध किंवा गुंगीत असलेल्या महिलांवर लैंगिक अत्याचार करत असे. केबिनमधील दिवे घालवल्यानंतर कोणालाही केबिनमध्ये प्रवेश नव्हता. ही कोड लँग्वेज त्याच्या कर्मचाऱ्यांनाही माहिती होता.
या पेढ्यात तो नेमकं काय मिसळायचा याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, अशोक खरातने या रहस्यमयी पाण्याबद्दल व पेढ्याबाबत काहीच माहिती पोलिसांना दिलेली नाही. त्याच्याकडून सर्व माहिती काढून घेण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीची मुदत तिसऱ्यांना वाढवली आहे. एसआयटी आता या पेढ्यांचा आणि खारट पाण्याचा खरा स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काही दिवसांत या गूढ औषधांचे रहस्य उलगडते का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.