Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"रुपाली चाकणकर असंख्य महिलांना अशोक खरातकडे घेऊन गेल्या", राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा गंभीर आरोप

"रुपाली चाकणकर असंख्य महिलांना अशोक खरातकडे घेऊन गेल्या", राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा गंभीर आरोप


राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकरांनी अशोक खरातला अनेक महिलांसमोर प्रमोट केलंय. सामान्य महिलांबरोबर उठबस करायची सोडून मंत्री आणि अधिकाऱ्यांबरोबर उठबस केली. त्यांच्यासमोर बोलताना सामान्य महिलांना कॉम्प्लेक्स यायचा, असेही गंभीर आरोप त्यांनी केलेत.

कुंपणच शेत खात होतं

“ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. कुंपणच शेण खातंय हे ऐकलं होतं. पण इथं कुंपणाने शेत लांडग्याकडे नेऊन ठेवलंय. अशोक खरातच्या कार्यालयात नितीन जाधव नावाचा मुलगा काम करत होता. त्या मुलाचं लग्न झालं. बाबाची नजर त्याच्या बायकोवर गेली. एकदा बायकोला भेटायला आण असं बाबा म्हणाला. माझा मालक काय करतो हे नितीनला माहितेय. मग त्याच्या बायकोवर बाबाची नजर गेल्याने त्याने ऑफिसमध्ये स्पाय कॅमेरे फिट केले. त्याचे फुटेज तो घेत राहिला. त्यातले काही फुटेज घेऊन हा गायब झाला”, असं आशा मिरगे म्हणाल्या.

पीडितेच्या कुटुंबियांमुळे बाबाचं बिंग फुटलं
पुढे त्या म्हणाल्या, “तीन महिने तो गायब होता. त्यानंतर त्याने एका महिलेला क्लिप पाठवली. तिच्याकडे पैशांची मागणी केली. पण त्या संबंधित पीडित महिलेला घरातील पुरुषांनी मदत केली. त्यांनी तिच्यावर विश्वास दाखवला. कुटुंबियांनी तिला सहकार्य केलं. तेव्हा अहिल्यानगरमध्ये तिच्या कुटुंबियांनी नितीन जाधवविरोधात गुन्हा दाखल केला. बाबांना कळलं हे आपल्याभोवती येणार. त्याने लगेच नाशिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे व्हिडिओ मॉर्फ व्हिडिओ आहेत, असा त्याने आरोप केला.”

पण नाशिकचे एसपी कर्तव्यदक्ष आहेत. त्यांनी हे फोटो फॉरेन्सिककडे पाठवले. हे फोटो खरे होते. ते सीसीटीव्हीचे क्लिप होते. पण नितीन जाधव अहिल्यानगर पोलीस ठाण्यात कैद होता. म्हणून त्याच्या मोबाईल तपासणीचे आदेश दिले. त्याच्या मोबाईलमध्ये ५८ व्हिडिओ सापडले आणि २०० फोटो मिळाले. हे तर हिमनगाचं टोक आहे”, असं त्या म्हणाल्या.
रुपाली चाकणकरांमुळे कॉम्प्लेक्स यायचा

“महिला आयोग विश्वासाचं न वाटण्याचं कारण म्हणजे ते महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे पाहिल्यावरच कळतं. याच्या अगोदरच्या अध्यक्षा डोळ्यांपुढे आणा. विजयाताई रहाटकर, सुशीबेन शाह, निर्मला प्रभावळकर आणि आमच्यासारखे सदस्य. एखाद्या राह चलती महिलेलाही वाटेल की ताई माझी गोष्ट ऐक. पण यांचा अॅटिट्युड, यांचा ड्रेस सेन्स, यांचा मेकअप, यांचा ग्लॅमर, यांची आर्टिफिशिअल नखं, माझ्यासारख्याच महिलेला त्यांच्याशी बोलताना असं वाटायचं की पदर वगैरे नीट घ्यावा मग बोलावं. कारण कॉम्प्लेक्स यायचा”, अशी टीकाही रुपाली चाकणकर यांच्यावर केली.

संघटनात्मक पदावर बसून संघटनेचं काम केलं
“जेव्हा आमचा पक्ष एकत्र होता, मलाही कॉम्प्लेक्स यायचा. या महिलेची सतत उठबस किंवा सोशल मीडियावरील वावर कधीच महिलांबरोबर नव्हता. सतत मंत्री-संत्री, ऑफिसर्स यांच्याबरोबर असायच्या. म्हणजे २४ बाय ७ त्यांनी संघटनात्मक पदावर बसून त्यांनी संघटनेचं काम केलं. हे प्रत्येकापर्यंत पोहोचत होतं. त्यामुळे पीडितांनाही माझ्या कामाचं कोण, इथे गेल्यावर माझा वेळ वाया जाईल, हे माहीत होतं. आयोगातही त्यांनी राजकारण केलं”, असं आशा मिरगे म्हणाल्या.
बाबाने ताईंना नजरेनेच खाललं होतं

“सोशल मीडियावरील फोटोंमध्ये केक भरवताना फोटोमध्ये बाबाची नजर पाहा. तुला-मलाही कळेल की बाबाची नजर कशी आहे. तो नजरेने खातोय रुपाली ताईंना. आणि यांना कळलं नाही.. मग दोनपैकी एक गोष्ट आहे की या मठ्ठ बुद्धी आहेत त्यांना एवढं कळलं नाही. किंवा या त्याच्या पार्टनर आहेत. या सर्व गोष्टींमध्ये मदत करणाऱ्या आहेत”, असंही त्या म्हणाल्या.

रुपाली चाकणकरांनी असंख्य महिलांना बाबांकडे नेलं असेल
“त्यांच्याकडे जाणाऱ्या लोकांमध्ये तीनप्रकारचे लोक आहेत. फक्त भेट देणारे आहेत. त्यांचे समर्थक आहेत. किंवा त्यांचे पार्टनर्स आहेत. त्यात एक नंबरवर दीपक केसरकर आणि दोन नंबरवर रुपाली चाकणकर. आपल्या आजूबाजूच्या लोकांना तिथपर्यंत नेणे. असंख्य महिलांना त्यांनी नेलं असेल. महिला संघटनांची मिटींग असताना हा बाबा तिथे जायचा. ओपनली हे बाबा माझे गुरू आहेत. मी आज जिथे पोहोचली आहे ती यांच्यामुळे पोहोचली आहे. हे माझे पांडुरंग आहेत, अशा पद्धतीने वक्तव्य करून रुपाली चाकणकर भोळ्या भाबड्या लोकांना सांगायच्या. त्या महिलांसमोर अप्रत्यक्षपणे प्रमोट करायच्या”, असा गंभीर आरोप आशा मिरगे यांनी केला. त्या एबीपी माझ्याच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.