🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सर्वात मोठा गौप्यस्फोट! मंत्रिमंडळातील ९ मंत्री खरातचे भक्त

सर्वात मोठा गौप्यस्फोट! मंत्रिमंडळातील ९ मंत्री खरातचे भक्त


नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या प्रकरणात आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत. राज्यातील ९ मंत्री या भोंदू बाबाचे नियमित भक्त होते आणि ते अत्यंत घृणास्पद विधी करत होते, असा दावा राऊतांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, या भोंदू बाबाने पोलिसांना जी माहिती दिली आहे, ती जरी गोपनीय असली तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातील नऊ मंत्री त्याचे नियमित भक्त होते. हे मंत्री भोंदू बाबाकडे जाऊन 'अत्यंत घृणास्पद' प्रकारचे विधी करत होते. ही केवळ अंधश्रद्धा नसून महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारे हे प्रकरण आहे. दरम्यान, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राऊतांनी लावून धरली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.