पन्नाशीत पुरुषांनी ही टेस्ट आवर्जून करा, अक्षय कुमारची विनंती; वडिलांचं या गंभीर आजाराने झालेलं निधन
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारने नुकत्याच एका कार्यक्रमात वडील हरि ओम भाटिया यांच्या आठवणींना उजाळा दिला. अक्षयच्या वडिलांचं प्रोस्टेट कॅन्सरमुळे 2000 मध्ये निधन झालं होतं. याच गोष्टीची आठवण काढत अक्षयने विशेषकरून पुरुषांना दरवर्षी प्रोस्टेट स्पेसिफिक एंटीजन (PSA) टेस्ट करण्याच विनंती केली. त्याने सांगितलं की वडिलांना गमावण्यामागचं सर्वांत मोठं कारण हेच होतं की त्यांना वयाच्या 50-55 नंतर PSA (प्रोस्टेट स्पेसिफिक एंटीजन) टेस्टच्या महत्त्वाबद्दल माहितीच नव्हती. या टेस्टमुळे प्रोस्टेट कॅन्सरचं निदान होण्यास मदत होते.
‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2026’मध्ये अक्षय भावूक होत म्हणाला, “माझ्या माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती, माझ्या वडिलांना गमावलं आहे. वयाच्या 67 व्या वर्षी ते आम्हाला सोडून गेले. माझ्यासाठी ते सर्वस्व होते. त्यावेळी आम्हाला नियमित चाचण्यांबद्दल, स्क्रीनिंगबद्दल आणि त्यांच्या महत्त्वाबद्दल फारशी माहिती नव्हती. का? कारण मला हे माहितच नव्हतं की वयाच्या 50-55 नंतर प्रत्येकाने आपली PSA टेस्ट करणं महत्त्वाचं असतं. मी इथे उपस्थित सर्व लोकांना आणि जे टीव्हीच्या माध्यमातून मला ऐकत आहेत, त्या सर्व पुरुषांना मी आग्रह करतो की त्यांनी प्रोस्टेटच्या स्वास्थ्याकडे गांभीर्याने पहावं. दरवर्षी PSA टेस्ट करणं खूप महत्त्वाचं असतं.”
“सुरुवातीच्या टप्प्यातच आजाराचं निदान झाल्यास उपचाराने प्राण वाचवले जाऊ शकतात. त्यामुळे मी सर्व पुरुषांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपली PSA टेस्ट करून घ्यावी. प्रोस्टेट कॅन्सर सर्वसामान्य बनलंय. दर तिसऱ्या पुरुषाला प्रोस्टेट कॅन्सरचा धोका असतो. त्यामुळे वेळीच त्याचं निदान होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमचे प्राण वाचू शकतात. फक्त तुमचेच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे प्राण वाचू शकतात”, असं आवाहन अक्षयने चाहत्यांना केलं.
PSA टेस्ट म्हणजे काय?
प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजेन (PSA) आहे, जे प्रोस्टेट पेशींद्वारे तयार होणारं प्रथिनं आहे. पीएसए रक्त चाचणी तुमच्या रक्तातील पीएसएचं प्रमाण मोजतं. ते प्रामुख्याने प्रोस्टेट कॅन्सरचं निदान होण्यासाठी वापरलं जातं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
