Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- मिरज तालुक्यात दहावी-बारावी परीक्षेला गालबोट; बेळंकीत कॉपी बहाद्दर विद्यार्थिनीवर कारवाई

सांगली :- मिरज तालुक्यात दहावी-बारावी परीक्षेला गालबोट; बेळंकीत कॉपी बहाद्दर विद्यार्थिनीवर कारवाई


सांगलीत परीक्षा केंद्रात कॉपीप्रकरणी योग्य ती कारवाई सुरु

सांगली:  दहावी आणि बारावीच्या परीक्षेत १०० टक्के कॉपीमुक्ती करण्याच्या मोहिम सोमवारी खंडीत झाल्याचे स्पष्ट झाले. बाणिज्य पेपरमध्ये कॉपी करताना पथकाने एकाला पडले असून संबधित परीक्षार्थीवर कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 
बेळंकी (ता. मिरज) येथील कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात बाणिज्य शिक्षणक्रमाच्या एका पेपरलाकॉपीचा प्रकार निदर्शनास आला. एका विद्यार्थिनीने पॅडवर काही मजकूर कॉपी स्वरुपात लिहून आणल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. पथकातील सदस्यांनी पॅड, प्रश्रपत्रिका, उत्तरपत्रिका जप्त केली.
संबंधित विद्यार्थिनीला परीक्षा मंडळाच्या नियमानुसार दुसरी प्रश्रपत्रिका दिली. कारवाईचा अहवाल परीक्षा मंडळाला पाठवला. त्यानंतर आता मंडळाच्या नियमांनुसार संबंधित विद्यार्थिनीचा जबाब, पर्यवेक्षकाचा जबाब व अन्य प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.