सांगली: महापालिकाक्षेत्रातील सार्बजनिक दिवाबत्ती देखभाल दुरुस्तीसाठी नियुक्त केलेल्या वादग्रस्त समुद्रा कंपनीला ब्लक लिस्टमध्ये टाकण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिकेतील सत्ताधारी महायुतीने घेतला. मनपाच्या १८ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमिवर सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षांची संयुक्त पार्टी मिटिंग सोमवारी पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आला.
समुद्रा कंपनीबरोबरचा करार संपुष्टात येत असतानाच याबाबत नबीन कंपनी स्थापन करण्याबाबतही महायुतीकडून सावध पवित्रा घेण्यात आला. याबाबतची सविस्तर माहिती घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सभागृहनेते संदीप आवटी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान मनपात शिक्षण मंडळ पुन्हा एकदा अस्तिवात येणार असून कोल्हापूरमनपाच्या धर्तीवर स्वतंत्र सिटी बससेवा सुरू करण्यासाठी परिवहन समिती स्थापन करण्याबाबतही पार्टी मिटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला. याबाबतचा अंतिम निर्णय महासभेत होणार आहे.
यात प्रभाग क्र. २ मधील सांगली कोल्हापूर रस्त्यावरील शाहू महाराज स्मारक चौकास श्री गुरुनानक देव ाजी चौक असे नामकरण करण्याच्या विषयावर चर्चा होणार आहे. जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ नागरी दलितेतर बस्ती सुधारणा योजनेंतर्गत पालिका क्षेत्रातील. प्रशासक ठराव हे कामबदलून त्याऐवजी कोल्हापूर रोड, मिरज येथील रिस्टोरेशन चर्चसमोरील परिसर विकसीत करणे, सुवर्ण जयंती नागरोत्थान महाअभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा योजना बळब-टीकरणासाठी आवश्यक काम करणेसाठी ९,२६,५१,४८६ रुपयाची कामे १४ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त अनुदानाच्या व्याजातून करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामधील क्षेत्रातील विद्यमान एलईडी पथदिवे देखभाल दुरुस्ती तसेच नवीन एलईडी लाईटस् आणि सी.सी.एम. शुल्क, सेवा-सुविधांचे दर इ. निश्चित महानगरपालिका कराचे दर, ‘इतर करणेकामी नवीन दर सुधार समिती गठित करणेस मान्यता देण्याबाबत सभेत चर्चा होईल.
बैठकीमधील महत्वपूर्ण निर्णय
समद्रु कंपनीला काळ्या यादीत टाकणार. नविन कंपनी स्थापन करण्याबाबत सविस्तर माहिती घेतल्यानंतरच अ-‘तिम निर्णय घेण्यात येणार, मनपाची स्वतंत्र परिवहन समिती स्थापणार. शिक्षण मंडळाची पुन्हा स्थापना. मिरज हायस्कूल व गुठेवारी समितीची स्थापनाएस चा पुरवठा, स्थापना आणि देखभाल दुरुस्ती १० वर्षेसाठी राज्यस्तरावर दिलेल्या निविदाधारक मेसर्स बीएससी इन्फ्राटेकआणि बिंकी ग्लोबल संस्थेबरोबर करा-रनामा आणि साहित्याच्या व देखभाल-दुरुस्तीच्या अंदाजे २५ कोटीच्या खर्चास मान्यता देण्याच्या विषयावर चर्चा होणार आहे. झाडांचे जतन व वृक्ष प्राधिकरण समिती गठित करणेस् तसेच सदस्यांची संख्या व नावे निश्चित करण्यात येणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
