अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल संकटाचा आणि भारतातील एलपीजी संकटाचा थेट परिणाम बाजारावर झाला आहे. गॅसच्या टंचाईमुळे अनेक जण त्रस्त आहेत. तर काहींनी इंडक्शन खरेदी करण्यासाठी धाव घेतली आहे. पण जर तुमच्याकडे ही वस्तू असेल तर तुम्हाला अन्न शिजवण्याचे, स्वयंपाकाचे टेन्शनच राहणार नाही. ती गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक प्रेशर कुकर किंवा राईस कुकर.
बाजारात इलेक्ट्रिक प्रेशर कुकर किंवा राईस कुकर असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे प्रेशर कुकरसारखे काम करतात, ज्यामुळे तुम्ही भाज्या, मांसाहारी पदार्थ, भात, बिर्याणी आणि सूप बनवू शकता. याशिवाय, इलेक्ट्रिक प्रेशर कुकरमध्ये इडली देखील बनवता येतात.
इलेक्ट्रिक प्रेशर कुकर कसा वापरायचा ?: इलेक्ट्रिक प्रेशर कुकर हा विजेवर चालतो. तो वापरताना त्यात हवे ते पदार्थ टाकून नंतर फक्त कुकर प्लग इन करून स्विच चालू करायचा, अशा प्रकारे स्वयंपाक प्रक्रिया सुरू होते.
चालू आणि बंद करणे सोपं : इलेक्ट्रिक प्रेशर कुकरमध्ये एक कंट्रोलर असतो, जो तुम्हाला कुकर चालू किंवा बंद करण्याची आणि त्याचे तापमान योग्य करण्याचा ऑप्शन्स देतो. इलेक्ट्रिक प्रेशर कुकर वेगवेगळ्या क्षमतेचे येतात. ही क्षमता लिटरमध्ये असते. नवीन इलेक्ट्रिक कुकर खरेदी करताना, तुम्हाला किती लिटरची आवश्यकता आहे याचा विचार करा मगच पुढे जा.
इलेक्ट्रिक प्रेशर कुकरची किंमत किती ?: इलेक्ट्रिक प्रेशर कुकरची सुरुवातीची किंमत 1499 रुपये आहे. ब्लूबेरी, पिजन आणि बजाज सारखे ब्रँड या किमतीत हा कूकर विकतात. वाढती लिटर क्षमता आणि वैशिष्ट्यांसह, किंमत बदलू शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
