महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, भोंदूबाबा खरातच्या लेकीच्या लग्नपत्रिकेत बड्या नेत्यांची नावं; पहिलं नाव...
भोंदूबाबा अशोक खरात याच्या राजकीय संबंधावरुन महाराष्ट्रात रणकंदण माजलं आहे. खरातचं प्रकरण समोर आल्यानंतर त्याचे कित्येक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर आले. ज्यामुळे अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. यातूनच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. दरम्यान खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका समोर आली असून यावर अनेक राजकीय नेत्यांची नावं असल्याचं दिसून येत आहे.
अशोक खरात याच्या मुलीचा विवाह नाशिक येथे पार पडला. या सोहळ्याच्या पुत्रिकेवर राज्यातील बड्या पक्षाच्या नेत्यांची नावं असल्याचं दिसून येत आहे. या पुत्रिकेत दिल्यानुसार, खरातच्या मुलीच्या लग्नात प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ शिंदे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, रुपाली चाकणकर, दीपक केसरकर, मिलींद नार्वेकर यांचे नावं आहेत. सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची नाव भोंदूबाब खरात याच्या मुलीच्या लग्न पत्रिकेवर असल्याचं समोर आलं असून विशेष म्हणजे अनेक राजकीय नेते या समारंभ सोहळ्यात उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.