Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गॅस बुकिंगसाठी मर्यादा; आता 'या' योजनेतील रेशनकार्डधारकांना प्रत्येकी ५ लिटर रॉकेल मिळणार?

गॅस बुकिंगसाठी मर्यादा; आता 'या' योजनेतील रेशनकार्डधारकांना प्रत्येकी ५ लिटर रॉकेल मिळणार?


अहिल्यानगर : आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे शासनाने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना गॅस बुकिंगसाठी मर्यादा घालून दिली आहे. भविष्यात सिलिंडर टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील रेशनकार्डधारकांना प्रत्येकी पाच लिटर रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील साडेसात लाख लाभार्थ्यांसाठी ३० लाख लिटर रॉकेलची गरज राज्य शासनाला कळविली आहे.

जिल्ह्यातील अनेक कुटुंबाकडे एकापेक्षा अधिक गॅस टाक्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी गॅस टंचाई निर्माण झाली तर काही लाभार्थ्यांनी टंचाईचा फायदा घेत व्यावसायिकांना चढ्या दराने घरगुती सिलिंडरची विक्री केली. प्रशासनाने अनेक ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली. यात शेकडो घरगुती सिलिंडर व्यावसायिकांकडून जप्त केले आहेत. राज्य शासनाने शहरातील लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर बुकिंगसाठी २५ दिवसांची मर्यादा घातली आहे तर ग्रामीणमधील कुटुंबांना ४५ दिवसांची मर्यादा आहे.

अशा स्थितीत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांची परवड होऊ नये, यासाठी त्यांना रॉकेल दिले जाणार आहे. याबाबत राज्य शासनाने जिल्हा पुरवठा विभागाकडून वितरण आणि लाभार्थ्यांची माहिती मागवली होती. हा अहवाल पुरवठा विभागाने नुकताच शासनाला सादर केला आहे.
प्रति कुटुंब पाच लिटर रॉकेल

◼️ गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून रॉकेल दिले जाणार आहे. याबाबत राज्य पातळीवर नियोजन केले जात आहे.
◼️ शासनाने प्रत्येक जिल्हा पुरवठा विभागाकडून वितरण आणि लाभार्थ्यांची माहिती मागवली आहे.
◼️ अंत्योदय व प्राधान्यक्रमाच्या प्रत्येकी रेशनकार्डधारक पाच लिटर रॉकेल मिळू शकते.
◼️ मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रॉकेल वितरित केले जाण्याचा शक्यता आहे.

दुकानदारांचा रॉकेल विक्रीला नकार
◼️ जिल्ह्यात ४१ घाऊक रॉकेल विक्रेते आणि दहा सेमी घाऊक विक्रेत्यांनी रॉकेल पुरवठा करण्यास नकार दिला आहे.
◼️ पुरवठा विभागाने याबाबतची माहिती शासनाला दिली आहे.
◼️ मात्र, धान्य वाहतूकदारांनी रॉकेलची वाहतूक करण्याची तयार दर्शवली आहे.
◼️ त्यामुळे रेशन दुकानातून अन्यथा पेट्रोल पंपावरून लाभार्थ्यांना रॉकेलचा पुरवठा केला जाऊ शकतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.