Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भविष्यवाणी इथेच शिकलात का दादा? अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

भविष्यवाणी इथेच शिकलात का दादा? अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा


पुणे : नाशिक पोलिसांनी बलात्कार प्रकरणात एका अशोक खरात उर्फ कॅप्टन याला अटक केली आहे. अशोक खरात हा लोकांचे भविष्य सांगत होता, त्याच्याकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी जात होते, अशी माहिती समोर आली आहे.

खरातसोबतचे अनेक राजकीय नेत्यांचे फोटो व्हायरल झाल्यामुळे विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. अशातच आता मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका कथित भोंदू व्यक्तीसोबतच्या फोटोवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, नगरसेवक अमोल बालवडकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे. बोगस भविष्यवाणी इथेच शिकलात का दादा! अशी टीका बालवडकर यांनी चंद्रकांत पाटलांवर केली आहे.

अमोल बालवडकर यांनी सोशल मिडीयातून म्हटले की, उच्च तंत्र की उच्च तंत्र मंत्र! बोगस भविष्यवाणी इथेच शिकलात का दादा! आदरणीय नामदार चंद्रकांत दादा मला आशा आहे आपल्या साध्या भोळ्या स्वभावाचा संबधित नराधम खरात याने गैरफायदा घेतला नसेल! जरी घेतला असेल तरी सदरील व्यक्तीची आपण कोणत्याही दबावात न येता रीतसर तक्रार करावी. आपण कोल्हापूरचे असलात तरी पुणेकर विशेषतः कोथरुडकर आपल्या कायम सोबत आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापूरचा वारसा सांगत फुले-रानडे-आगरकर या थोर समाजसुधारकांच्या पुण्यात आपण आलात. संतांनी प्रबोधन केलेल्या या महापुरुषांच्या महाराष्ट्रात उच्चशिक्षणासारखी गंभीर जबाबदारी असणारे चंद्रकांत पाटील हे मंत्री या भोंदू बाबासमोर इतके लीनदीन होऊन का बसले असतील, सदरील नराधम हा जप करून कोणत्या प्रकारच्या मंत्राचा आपल्यावर प्रयोग करत आहे हा प्रश्न कोथरूडच्या अत्यंत सुसंस्कृत आणि सुशिक्षित मतदारांना पडला आहे. कदाचित या मंत्राच्या प्रभावामुळे आपण कोथरुड येथील नागरिकांच्या समस्या सोडवू शकले नाही.. खरातसारख्या नालायक माणसासमोर मान तुकवणारा माणूस कोथरूडचा प्रतिनिधी कसा असू शकतो, ही चिंता कोथरुडकरांना पोखरून काढते आहे. कुठले आकडे जुळवायला आणि कसले भविष्य जाणून घ्यायला आपले चंद्रकांत दादा भोंदु खरातच्या नादी लागले, याचा खुलासा मायबाप कोथरूडकर जनतेसमोर तुम्ही केला पाहिजे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.