Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इस्रायलनं हल्ला करताच इराणचा मोठा निर्णय; भारताला बसणार फटका, पेट्रोल डिझेलचे दर वाढणार?

इस्रायलनं हल्ला करताच इराणचा मोठा निर्णय; भारताला बसणार फटका, पेट्रोल डिझेलचे दर वाढणार?
 

इस्त्रायलने इराणमधील खामेनेई यांचे कार्यालय आणि अणुऊर्जा संघटनेच्या कार्यालयावर हल्ला केला आला. या हल्ल्यात खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या युद्धाचा फटका आता इतर देशांना देखील बसणार असून याचे अर्थकारणावर दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे आहेत. खनिज तेलाच्या किमती आणखी भडकू शकतात, अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, युद्धाची तीव्रता आणखी वाढल्याने इराणे होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याची माहिची आहे. भारतामध्ये प्रामुख्याने याच मार्गाने खनिज तेल येते. सौदी अरेबिया, इराक आणि संयुक्त अरब अमिराती या देशांकडून भारत खनिज तेल आयात करतो. अशावेळी पुरवठा साखळी खंडीत झाल्याने याचा भारताला मोठा फटका बसू शकतो.

होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री तेलमार्गांपैकी एक मानली जाते. इराण आणि ओमान यांच्यादरम्यान असलेली ही अरुंद सामुद्रधुनी परशियन गल्फमधील तेल जगभर पोहोचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जगातील सुमारे २०% कच्चे तेल या मार्गाने वाहतूक होते. त्यामुळे ही सामुद्रधुनी बंद झाली तर त्याचा मोठा परिणाम भारतासह अनेक देशांवर होऊ शकतो. भारत आपल्या एकूण तेल गरजेपैकी सुमारे ८५% तेल आयात करतो. यातील मोठा भाग सौदी अरेबिया, इराक, कुवेत, आणि यूएई सारख्या आखाती देशांतून येतो. या देशांमधून येणारे बहुतांश तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीमधूनच भारताकडे येते. ही सामुद्रधुनी बंद झाली तर भारताचा तेलपुरवठा खंडित होऊ शकतो. अशावेळी पुरवठा कमी झाल्याने भारतात पेट्रोल डिझेलेच दर वाढू शकतात, अशी शक्यता आता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.