Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुणालाच सोडलं नाही. एका झटक्यात खामेनेईचा वंश संपवला, मुलगी, नातू आणि जावईही ठार. इराणमध्ये हाहा:कार

कुणालाच सोडलं नाही. एका झटक्यात खामेनेईचा वंश संपवला, मुलगी, नातू आणि जावईही ठार. इराणमध्ये हाहा:कार
 

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यात ठार झाले. फक्त आयातुल्ला अली खामेनेई हेच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य मारले गेले. इराणवर अमेरिका आणि इस्त्रायलने हल्ला केला. त्यांच्या निशाण्यावर सुरूवातीपासूनच आयातुल्ला अली खामेनेई होते. शेवटपर्यंत आयातुल्ला अली खामेनेई यांना इराणची सत्ता सोडण्यासाठी अमेरिकेकडून धमकावले जात होते. शेवटी अमेरिकने आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार केले. इराणी मीडियावर आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या बातम्या चालवल्या जात आहेत. अमेरिकेकडूनही आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूचा दावा करण्यात आला. 40 दिवसांचा दुखवटा इराणमध्ये जाहीर करण्यात आला. यासोबतच आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण अधिक आक्रमक होताना दिसतोय. इराणने स्पष्ट म्हटले की, आता इराण शांत बसणार नसून आम्ही अमेरिकेला सोडणार नाहीत. इस्त्रायलमध्येही हल्ले केली जात आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची घोषणा केली. काल अमेरिकेकडून इराणवर थेट हल्ला करण्यात आला. इस्त्रायल आणि अमेरिका यांनी मिळून हा हल्ला केला. अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनेई यांच्या कुटुंबातील कोणीही जिवंत राहिले नाही. ज्यावेळी हा हल्ला झाला, त्यावेळी कुटुंब एकत्र होते. लहान मुलेही ठार झाल्याची माहिती आहे. 
 
आयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर करण्यात आलेल्या हल्यात त्यांची मुलगी, जावई, सून यांचे निधन झाले. यासोबतच आयातुल्ला अली खामेनेई यांच्या नातवाचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. इराणमधील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणावर अमेरिकेकडून हल्ला करण्यात आला. आयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी जगाला धक्का दिला.

इराणमधील लोकांना आपले स्वतंत्र परत मिळाल्याचे डोनाल्ड ट्रम्पयांनी म्हटले. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, ज्या ठिकाणी हल्ला झाला, तिथे तपासले असता आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृतदेह दिसला. त्यानंतर आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृतदेह डोनाल्ड यांना दाखवण्यात आला. अनेक दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे आयातुल्ला अली खामेनेई यांना धमक्या देताना दिसले होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.