मंत्र्यांवर अनैतिक संबंधाचा आरोप; बायकोने नको त्या अवस्थेत पाहिलं, राजकीय वर्तुळात खळबळ
केरळचे मंत्री केबी गणेश कुमार यांच्यावर अनैतिक संबंधाचे गंभीर आरोप करण्यात आलाय काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष यदु कृष्णन यांनी हा गंभीर आरोप केलाय.
केरळच्या मंत्र्यांच्या पत्नीने पतीला नको त्या अवस्थेत पाहिल्याचा दावा करण्यात आलाय केरळच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. केरळचे मंत्री आणि अभिनेता केबी गणेश कुमार यांच्यावर अनैतिक संबंध आणि बायकोशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. केरळमधील काँग्रेसची विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष यदू कृष्णन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गंभीर आरोप केले आहेत. कृष्णन यांनी पोस्ट करत वैयक्तिक आरोप केले आहेत. या आरोपाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसची विद्यार्थी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष यदू कृष्णन यांच्याकडून पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, मंत्र्यांच्या बायकोला अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. त्यानंतर यावरून घरात वादाची ठिणगी पेटली. मंत्र्यांच्या बायकोकडे पुरावे देखील आहेत. कृष्णन यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कृष्णन यांच्या पोस्टची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
कृष्णन यांच्या पोस्टदरम्यान मंत्री केबी गणेश कुमार यांच्या बायकोची प्रतिक्रया समोर आली आहे. पत्नी बिंदू यांनी म्हटलं की, माझ्या पतीला नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. त्यांच्या विरोधात काही पुरावे मोबाईलमध्ये कैद केले आहेत'. बायकोने आरोप केल्यानंतर प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे.
बिंदू यांनी पुढे म्हटलं की, 'मी पुरावे मोबाईलमध्ये कैद केले. त्यानंतर त्यांच्या चालकाने माझा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्या गैरवर्तन केलं. मी मोबाईलमध्ये कैद केलेले फोटो आणि व्हिडिओ समोर येऊ नये, यासाठी माझा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बायको बिंदू यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या पोस्टनंतर कृष्णन यांनी थेट पोलिसांनाही चॅलेंज दिलं आहे. मी केलेले आरोप खोटे असतील, तर माझ्यावर कारवाई करा, असंही कृष्णन यांनी म्हटलं आहे. कृष्णन यांच्या आरोपानंतर पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.