Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत उद्या पहिल्याच सभेत विविध विषयांवर वादळी चर्चा होणार

सांगलीत उद्या पहिल्याच सभेत विविध विषयांवर वादळी चर्चा होणार
 

सांगली महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा २ मार्च रोजी सांगली - महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा सोमवार, २ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात होणार आहे. यासाठी नगरसेवकांकडून शहराच्या प्रशासन, पायाभूत सुविधा, वाहतूक, स्वच्छता आणि सांस्कृतिक उपक्रमांशी संबंधित एकूण सात प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

दरम्यान पहिल्याच महासभेत कृष्णा नदी प्रदूषण मेलेल्या माशांचा खच यासह विविध विषयावर बादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागांचे उपविधी अद्याप तयार नसल्यामुळे कामकाजात अडचणी येत असल्याचा मुद्दा नगरसेवक संतोष पाटील यांनी उपस्थित केला आहे. यासाठी पदाधिकारी व अधिकारी यांची समिती गठित करून उपविधी तयार करावेत व ते शासनाच्या मान्यतेसाठी पाठवावेत, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. 
शहरातील पथदिव्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी बाढत असल्याचा मुद्दा नगरसेवक युबराज बावडेकर यांनी सभेपुढे मांडला आहे. एलईडी पथदिव्यांच्या बसवणी व देखभाल दुरुस्तीचे कोट्यवधी रुपयांचे काम खासगी कंपनीला देण्यात आले असले, तरी अपेक्षित उद्दिष्टे साध्य झालेली नाहीत. त्यामुळे या संपूर्ण कामगिरीचा गांभिर्याने आढावा घ्यावा, अशी मागणी केली आहे. वॉर्ड क्रमांक ९ मधील आबा धोतरे घरसंकुलपरिसरात पूर्वी बांधलेली सार्वजनिक शौचालये सध्या वापरात नसून त्या ठिकाणी गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. झोपडपट्टीचे पुनर्वसन झाल्याने ही शौचालये निरुपयोगी ठरली असून ती पाडण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव नगरसेवक संतोष पाटील यांनी मांडला.

बॉर्ड क्रमांक ९ मधील शिंदे मळा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक येथे उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याच्या परिसरात ३१ मे रोजी जयंती साजरी करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी व जयंती समिती गठित करावी, असा संयुक्त प्रस्ताव नगरसेविका वर्षा सरगर, नगरसेविका रोहिणी पाटील, नगरसेवक संतोष पाटील आणि नगरसेवक अतुल माने यांनी सादर केला आहे. सांगलीतील वॉर्ड क्रमांक १८ मधील हनुमाननगर भाजी मंडई रस्त्यावर असलेले धोकादायक व वाहतुकीस अडथळा ठरणारे विद्युत खांब हटवण्याचा मुद्दा नगरसेवक अभिजीत भोसले यांनी उपस्थित केला आहे. यासाठी महावितरणला द्यावी लागणारी रक्कम महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करून विद्युत खांब काढण्याबाबत निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती शहरी नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या भुयारी गटार टप्पा क्रमांक २ ची कामे अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत. या कामाच्या विलंबाबाबत चर्चा करून ठोस निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव नगरसेवक अभिजीत भोसले यांनी सभेसमोर ठेवला आहे. मिरज वॉर्ड क्रमांक ६ मध्ये पोलीस स्टेशनलगत तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर 2112 हातगाड्या व साहित्य ठेवले जात असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. नागरिकांच्या मागणीनुसार सदर फुटपाथ काढण्याबाबत निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव नगरसेवक मैनुद्दीन बागवान यांनी मांडला.
 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.