स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांची आज ११६ वी जयंती. १२ मार्च १९१० हा त्यांचा जन्मदिवस. काय योगायोग असतो बघा. बाळासाहेबांचा दरारा असा हाेता की, महाराष्ट्रातील कोणत्याही मंत्र्याचा असा दरारा बघायला मिळालेला नाही. पण, बाळासाहेब हे फार हळवे आणि अतिशय मोकळ्या मनाचे होते. आज त्यावेळचे मंत्रिमंडळ डोळ्यांसमोर येते... यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा, बाळासाहेब, राजारामबापू, यशवंतराव माहिते, मधुकरराव चौधरी, प्रतिभाताई पाटील, शेषराव वानखेडे, नरेंद्र तिडके, शरद पवार, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब भारदे, विधान परिषद सभापती वि. स. पागे अशी टीम आता बघायला मिळाची नाही. त्यावेळी १९६० ते १९८० या २० वर्षांत उभी राहिलेली मोठी ३२ धरणे, ३५०० मध्यम धरणे, हजारो छोटे पाटबंधारे, चार कृषी विदयापीठे, नवी मुंबईची िनर्मिती, रोजगार हमी आणि कापूस खरेदी यासारख्या योजना. साधने कमी असताना, तंत्रज्ञाान नसताना, महाराष्ट्राने या २० वर्षांत जे केले आणि दुष्काळावर मात करून महराष्ट्राला अन्न-धान्याच्या आघाडीवर स्वावलंबी बनवले. नंतरची २५ वर्षांत फक्त गगनचुंबी इमारती... शहरात लखलखाट आणि ग्रामीण भागात रखरखाट... आज तो विषय नाही...
बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने योगायोगाची एक आठवण झाली. बाळासाहेब गृहमंत्री होते... कृषी मंत्री होते... बांधकाम मंत्री होते... शिक्षण मंत्री होते... १९७२ च्या शपथविधी समारंभासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांना फोन आला की, ‘संध्याकाळी तुमचा शपथविधी आहे... राजभवनवर या... असा मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे...’ १९७२ च्या शपथविधीची ही गोष्ट. बाळासाहेबांना आलेला तो फोन... त्यांच्या मांडीवर बसलेल्या चार वर्षांच्या ‘शंभू’ म्हणजे आजचे परिवहन मंत्री शंभुराज देसाई... यांच्या कानाला लावला. शंभू त्यांचा नातू. बाळासाहेब म्हणाले, ‘शंभू, तू पण मंत्री होशील रे...’आणि यालाच योगायोग म्हणतात.... तो एक दिवस आला... आणि शंभूराज देसाई उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात गृहखात्याचेच राज्यमंत्री झाले. बाळासाहेबांकडे गृहखाते होेते. बाळासाहेब त्यावेळी ‘मेघदूत’ या बंगल्यात रहात होते. शंभूराज हे नंतर एकनाथ शिंदे यांच्या मंित्रमंडळात कॅबिनेट मंत्री झाले आणि आज त्यांना, आजोबा राहात असलेला ‘मेघदूत’ हाच बंगला मिळाला....या वास्तूत प्रवेश करताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. बाळासाहेब म्हणाले होतेे ते शब्द खरे ठरले होते... आणि त्यांना बाळासाहेबांचाच बंगला मिळावा... काय योगायोग... राजकारणात असा योगायोग कोणाच्याच वाट्याला आलेला नाही. पहिल्यांदाच मंत्री होताना आजोबांचेच खाते (गृह) आणि आजोबांचाच बंगला. (मेघदूत...)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.