Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिव्यांग कल्याणनंतर आता महसूल विभागाची बारी :, तुकाराम मुंढेची तडकाफडकी बदली

दिव्यांग कल्याणनंतर आता महसूल विभागाची बारी :, तुकाराम मुंढेची तडकाफडकी बदली 


आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. सध्या मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असणाऱ्या मुंढे यांच्याकडं नव्या बदलीच्या ठिकाणी तीन महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळं आता या नव्या विभागामध्ये ते कशा पद्धतीनं सुधारणा घडवून आणतात हे पाहावं लागणार आहे.

तुकाराम मुढेंकडं हे महत्वाचे विभाग सोपवले
तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्याकडं आता मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल आणि वन विभाग ही तीन खाती सोपवण्यात आली असून या विभागाचे सचिव म्हणून ते काम पाहणार आहे. यापूर्वी दिव्यांग मंत्रालयाचे सचिव म्हणून काम करत असताना त्यांनी या मंत्रालयातील अनेक गैरप्रकार बाहेर काढले होते, त्यामुळं या विभागाला एकप्रकारे शिस्त लावण्याचं काम त्यांनी केलं होतं.
बदल्यांचा विक्रम

तुकाराम मुंढे हे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तेव्हापासून आत्तापर्यंतच्या त्यांच्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या २३ ते २४ वेळा बदल्या झाल्या आहेत. याचं मुख्य कारण राजकीय हस्तक्षेप मोडून काढणे, थेट आणि कठोर निर्णय घेणे तसंच भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी उचललेली पावलं कारणीभूत आहेत. ते नेहमीच 'नो-नॉनसेंस' दृष्टिकोन ठेवतात, ज्यामुळं राजकीय नेत्यांशी अनेकदा त्यांचा संघर्ष झालेला आहे. (उदा. नवी मुंबई, नागपूर स्मार्ट सिटी प्रकरणात नितीन गडकरींसोबत वाद).

कुठे केलीत कामं?
आत्तापर्यंत त्यांनी जिल्हाधिकारी (सोलापूर, जालना), नवी मुंबई/नाशिक महानगरपालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका वाहतूक महामंडळ , विकास आयुक्त (असंघटित कामगार), कृषी विभाग सचिव इत्यादी पदांवर काम केले आहे. दुष्काळग्रस्त भागात आणि शहर प्रशासनात चांगले काम केल्याबद्दल ते प्रसिद्ध आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.